Now Reading:
काजळ लावल्याने बाळाला होऊ शकतो दृष्टिदोष; काजळाचे इतर ४ घातक परिणाम
काजळ लावल्याने बाळाला होऊ शकतो दृष्टिदोष; काजळाचे इतर ४ घातक परिणाम

भारत, इजिप्त आणि मध्य-पूर्व दिशेतील देशांमध्ये काजळ परंपरेनुसार वापरण्यात येते. त्यासाठी लोणारी कोळसा व तूप किंवा एरंडेल तेल याचे मिश्रण करून काजळ बनवले जाई. आपल्याकडे दृष्ट लागू नये, डोळे थंड व स्वच्छ राहावेत म्हणून डोळ्यांमध्ये काजळ लावतात. परंतु, हे बाळासाठी योग्य व सुरक्षित आहे की नाही, हा विषय सध्या चर्चेत आला आहे.

जुन्या समजुतींनुसार काजळ लावणे हे विविध कारणांसहित योग्य मानले गेले असले, तरीही अनेक शिशूवैद्य बाळाच्या डोळ्यांत काजळ लावण्यास सक्त मनाई करतात त्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत:-

शिस्यातून उद्भवणारे आजार

व्यवसायिकरित्या बनवल्या जाणा-या काजळामध्ये मोठ्या प्रमाणात शिसे (lead) आढळून येते. हे निश्चितच बाळासाठी हानिकारक आहे. कारण, अतिप्रमाणात संचयित शिसे बाळाच्या मेंदू व इतर अवयवांवर परिणाम करू शकते.

कमकुवत हाडे व रक्तशयाची बाधा

शिसे हाडांच्या सत्वावर हानिकारक परिणाम करू शकते. ज्यामुळे रक्तक्षय, कमी बुद्धांक, आकडी हे परिणाम घडून येऊ शकतात.

Harmful (दुषित) घटक  

काजळ तयार करण्याचे घटक जर दूषित असतील, तर ते काजळ बाळाच्या डोळ्यांस हानिकारक ठरेल.

अस्वच्छता

बाळाच्या डोळ्यांना काजळ लावताना आपली नखे अस्वच्छ व टोकदार असतील तर त्यामुळे बाळाला अस्वस्थता होऊ शकते तसेच संसर्गही होऊ शकतो.

इतर बाधा

काजळामुळे डोळ्यांत itch (खाज) येणे, पाणसर डोळे, तसेच विविध प्रकारच्या रोगप्रवणता होऊ शकतात. आंघोळ करताना जर काजळ पसरले तर डोळ्यांच्या चिंचोळीत ते साचते व त्यामुळे बाळाला अनेक बाधा होऊ शकतात.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.