Now Reading:
दुसऱ्यांच्या या ७ वस्तू वापरल्याने तुमच्या आरोग्याला धोका; होऊ शकतात दुर्धर आजार
दुसऱ्यांच्या या ७ वस्तू वापरल्याने तुमच्या आरोग्याला धोका; होऊ शकतात दुर्धर आजार

आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं सगळ्यांशी मिळून मिसळून वागावं, वस्तू एकमेकांशी वाटून वापराव्यात. पण काही गोष्टी एकमेकांशी शेअर(वाटल्याने) केल्याने तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. तर जाणून घ्या अशा ७ गोष्टी ज्या कधीच दुसऱ्याच्या वापरू नये किंवा दुसऱ्याला देऊ नयेत.

 

साबण-

जर तुम्हाला वाटतं की साबणाची वडी धुऊन वापरल्याने काही होत नाही तर तुम्ही साफ चुकीचे आहात. अमेरिकेतील एका अहवालाप्रमाणे ज्या खेळाडूंनी एकच साबण आंघोळीसाठी वापरला त्यांना त्वचारोगाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुसऱ्याचा साबण वापरू नये किंवा वापरायला देऊ नये.

 

टॉवेल-

तुमच्या रूममेटचं टॉवेल वापरत असाल तर त्वरित थांबवा. याने रोगांची देवाणघेवाण होते. पुढच्या वेळेस मित्रमैत्रिणीकडे राहायला जाताना स्वतःचं टॉवेल घेऊन जा.

 

रेझर-


रेझर शेअर केल्याने हेपेटायटिस बी, सी आणि एच.आय.व्ही. ची लागण होऊ शकते. त्याशिवाय त्वचारोगांचा धोकाही उद्भवू शकतो.

 

टूथब्रश-

टूथब्रश शेअर केल्याने रक्तातून पसरणाऱ्या रोगांची शक्यता असते. कितीही रोमॅण्टिक वाटलं तरी आपल्या जोडीदाराचा ब्रशसुद्धा वापरू नये.

 

डिओड्रंट स्टिक-

मित्राची डिओड्रंट स्टिक वापरल्याने त्वचेच्या पेशींमार्फत इन्फेक्शनचा संसर्ग होऊ शकतो.

 

नेलकटर-

आता म्हणाल हे कसं शक्य आहे? पण नेलकटर नखातील जंतू (fungus) पसरवतात. ज्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते.

 

पाण्याची बाटली-

दुसऱ्याची पाण्याची बाटली वापरल्याने थुंकीमार्फत रोगांची लागण होऊ शकते म्हणून नेहमी स्वतःची पाण्याची बाटली जवळ ठेवावी.

Input your search keywords and press Enter.