Now Reading:
अंटार्टिकाच्या मोहिमेवर गेलेली ISROची पहिली भारतीय महिला वैज्ञानिक!
अंटार्टिकाच्या मोहिमेवर गेलेली ISROची पहिली भारतीय महिला वैज्ञानिक!

इस्रोच्या (ISRO) २३ सदस्यीय टीमने अंटार्टिकामध्ये तब्बल एक वर्ष राहून एक नवा इतिहास रचला आहे. मुख्य म्हणजे यात एका महिला वैज्ञानिकाचाही समावेश होता. ५६ वर्षांच्या महिला ज्यांनी आयुष्यात एकदाही हिमवृष्टी पाहिली नव्हती त्यांनी अंटार्टिका सारख्या बर्फाळ प्रदेशात जाऊन नारी शक्तीची वेगळीच उंची गाठली आहे. मंगला मणी, ISROच्या पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत ज्यांनी ४०३ दिवसांहून अधिक काळ अंटार्क्टिकामध्ये घालवला.

नोव्हेंबर २०१६मध्ये अंटार्टिकामधील भारताच्या संशोधन केंद्रावर जाणाऱ्या मंगला या इस्रोच्या पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. संशोधन केंद्रावर त्या ग्राउंड स्टेशन चालवत होत्या आणि १० ते १४ कक्षांची देखरेख करून पुढच्या प्रक्रियेसाठी भारताला माहिती पाठवत होत्या. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की, “अंटार्क्टिका मिशन खरोखरच एक आव्हान होते. तेथील हवामान अतिशय थंड होतं. प्रत्येकाला ध्रुवप्रदेशी कपडे घालावे लागत होते. तीव्र थंडी असल्यामुळे दोन तीन तासानंतर आम्हाला उबदार ठिकाणी परत यावं लागायचं.”

या मोहिमेसाठी निवडलं जाण्याकरिता त्यांना आणि त्यांच्या बरोबरच्या सदस्यांना कठोर प्रशिक्षण घ्यावं लागलं होतं. काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर, त्यांना उत्तराखंडमध्ये औली या स्थानी पाठवण्यात आले. तिथे ९००० फूट उंचीवर त्या होत्या. १०,००० फूटांवर असलेल्या आणि बर्फाने पूर्णतः झाकलेल्या बद्रीनाथ येथे त्यांना तापमानाशी कसं लढावं याचं प्रशिक्षण देण्यात आलं.

मंगला मणी, भारताला तुमचा अभिमान आहे.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.