Now Reading:
वजन कमी करण्याव्यतिरिक्त ग्रीन टीचे ८ गुणकारी फायदे
वजन कमी करण्याव्यतिरिक्त ग्रीन टीचे ८ गुणकारी फायदे

वजन कमी करण्याचा विचार डोक्यात आल्यावर पहिलं नाव तोंडात येतं ते ग्रीन टीचं. पण तुम्हाला ठाऊक आहे का? ग्रीन टीचे याही व्यतिरिक्त बरेच फायदे आहेत जे तुमच्या घरकाम, आरोग्यासाठी गुणकारी आहेत. काय आहेत हे फायदे? जाणून घ्या पुढे-

१. सूर्यकिरणांपासून बचाव

सूर्याची किरणं त्वचेला इजा पोहचवतात. जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहिल्याने त्वचा लाल होते. यावर ओली टिबॅग ठेवल्याने तुमची त्वचा थंडावण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये आढळणारी द्रव्ये सनस्क्रीनसारखं काम करतात त्यामुळे त्वचेतील DNA ला पोहोचलेली इजा कमी होण्यास मदत होते.

२. पुरळांवर गुणकारी

पुरळ म्हणजेच पिम्पल्स एकप्रकारची डोकेदुखीच असते. पण ग्रीन टीचे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीमायक्रोबियल गुण पिम्पल्सना मिटवण्यास मदत करतात. पिम्पल्सच्या क्रिममध्ये ग्रीन टी मिसळून सहा आठवड्यांपर्यंत चेहऱ्याला लावल्यास पिम्पल्स दूर होतात. तसेच चेहरा साफ करण्यासाठी ओली टीबॅग चेहऱ्याला लावल्यास त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते.

३. खरचटल्यावर उपचार

ग्रीन टीमध्ये अँटीमायक्रोबियल व तुरटीसारखे गुण असतात. खरचटल्यावर किंवा एखादा किटक चावल्यावर ओली ग्रीन टीबॅग जखमेवर दाबून धरल्याने त्वचेची जळजळ कमी होते. तसेच संसर्गापासूनही संरक्षण मिळते.

४. अल्सर

अल्सरमुळे येणारी सूज प्रचंड त्रासदायक असू शकते. विशेषतः लहान मुलांना याचा जास्त त्रास होतो. सूज आलेल्या ठिकाणी टिबॅग ओली करून लावल्याने सूज आणि दुखणं दोन्हीही कमी होईल.

५. डोळ्याखालील काळ्या घेऱ्यांवर उपाय

जागरणामुळे डोळ्यांभोवती काळे घेरे (डार्क सर्कल्स) येतायत? गरम पाण्यामध्ये दोन टीबॅग भिजवत ठेवून त्यातलं अतिरिक्त पाणी पिळून त्या २० मिनिटांसाठी डोळ्यावर ठेवाव्यात. असे केल्याने चहामधील टॅनिन डोळ्यांना पुन्हा टवटवीत करतं.

६. उबाळांवर उपचार

उबाळांना निवळण्याकरिता ओली टीबॅग ठेवल्याने उबाळं बरी होण्यास मदत होते. चहामधील टॅनिन व इतर अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी संसर्गावर उपचार करण्यास मदत होते.

७. गृहशोभेसाठी फायदेशीर

घरातील आरसा, खिडकी, काचेवरील तेलाचे डाग साफ करण्यासाठी ग्रीन टी उपयोगी ठरते. तसेच लाकडी फर्निचर चमकवण्यासाठीही ग्रीन टी वापरता येते. तसेच ग्रीन टीच्या बॅग्स फ्रिजमधील दुर्गंधी शोषून घेण्यास फायदेशीर ठरतात.

८. बागकामात मदत

बागेमधील कंपोस्ट खतामध्ये टी बॅग्स टाकल्याने जमिनीमधील पोषकद्रव्ये वाढण्यास मदत होते. चहा जमिनीमध्ये नायट्रोजन पुरवण्यास मदत करते.

Input your search keywords and press Enter.