Now Reading:
तुमच्या पाल्यामध्ये जीवनावश्यक मूल्यांचे बीज रोवण्यासाठी १० सोपे मार्ग
तुमच्या पाल्यामध्ये जीवनावश्यक मूल्यांचे बीज रोवण्यासाठी १० सोपे मार्ग

मुलं मातीच्या गोळ्यासारखी असतात, त्यांच्या विचारांना व कृतींना जसा आकार द्याल तसे ते घडत जातात. पण तसं करताना तुम्ही त्यांना विनाकारण झापत नाही आहात ना याचे भान असावे. म्हणून घेऊन आलोय या १० टिप्स ज्यांच्या मार्फत तुम्ही घडवू शकता एक सृजनशील भविष्य तुमच्या पाल्यासाठी!

 

१. तुमच्या मुलांना देशभक्तीपर, आध्यात्मिक व बोधपर गोष्टी वाचून दाखवा. त्यातून त्यांनी काय धडा घेतला हे विचारा.

२. इतरांशी संवाद साधताना नम्रतेने, आदराने व विचारपूर्वकरित्या बोला.

३. बातम्या किंवा सिनेमा पाहताना तुमच्या मुलाशी संवाद साधा आणि त्यांना विचार की, तत्सम परिस्थितीमध्ये त्यांनी काय निर्णय घेतला असता. यातून त्यांची तर्कबुद्धी सुधारेल.

४. तुमच्या मुलांच्या मतांना आदरपूर्वक ऐकून घ्या, यातून त्यांचा आत्मविश्वास दुणावेल.

५. मुलांसोबत वेळ घालवा, तुम्ही त्यांच्यासोबत कसे वागता यावर त्यांचे भविष्य अवलंबून असते.

६. मुलांना इतरांना मदत करण्याच्या संधी उपलब्ध करून द्या, यातून त्यांच्यात परोपकारी भाव उत्पन्न होईल.

७. मुलाला समाजकार्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन द्या, जेणेकरून त्यामध्ये सेवाभाव निर्माण होईल.

८. मुलांसोबत आदर्श व्यक्तींबद्दल चर्चा करा, त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल बोला. आपोआप तुमच्या मुलांत ते गुण उतरतील.

९. पूजा अर्चा करताना तुमच्या मुलांना सोबत घ्या, यातून त्यांच्यात श्रद्धा भाव निर्माण होईल.

१०. त्यांच्या संवेदनशील वागण्याला बढावा द्या. एखाद्याची काळजी घेणे हे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव त्यांना करून द्या.

Input your search keywords and press Enter.