Now Reading:
मराठी महिलेने सुरु केलेली भारतातील पहिली महिला बँक जी पुरवते २ लाख महिलांना रोजगार
मराठी महिलेने सुरु केलेली भारतातील पहिली महिला बँक जी पुरवते २ लाख महिलांना रोजगार

‘माण देशी’ या बँकेची सुरुवात चेतना सिन्हा यांनी १९९७ ला केली. साताऱ्यातील माण तालुक्यातील म्हसवड गावातील एक लोहारीचा व्यवसाय करणारी कांताबाई नावाची महिला जेव्हा चेतना ताईंकडे बॅंकेत बचत खाते कसे उघडावे याची चौकशी करायला आली तेव्हा त्यांना ही कल्पना सुचली. ही सहकारी बँक ग्रामीण महिलांना कर्ज पुरवठा करते, तसेच कर्जदाराच्या आर्थिक परिस्थितीनुसार कर्जवसुलीची योग्य तरतूद करून महिलांना एक फार मोठा आर्थिक आधार मिळवून देते.

कर्ज,१ बचत गट, विमा आणि पेन्शन सुविधासुद्धा माण देशी बँक पुरविते. मोबाइल फोन, छोटे मोठे उद्योग यांसाठी ही बँक वित्त पुरवठा करते. येथे पाच हजारांपासून रक्कम दिली जाते. बँक एक दिवसापासून ते पाच वर्षांपर्यंतचे कर्ज देते. महिलांना रोज थोडी थोडी रक्कम बॅंकेत जमा करण्याची मुभा बॅंकेने दिली आहे. कर्ज वसुलीची ही एका दिवसाची रक्कम १५ ते २० रुपयांपासून सुरु होते. माण देशी बँकेच्या नऊ शाखांमध्ये दरदिवसा असे जवळपास १५००० व्यवहार होतात.

ई कार्ड म्हणजे इलेक्ट्रॉनिक पासबुकद्वारे सर्व कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यात येतात. अल्पबचत संधी देणाऱ्या या सुरक्षित, अनुकूल आणि मैत्रीपूर्व माण देशी बॅंकेने गावातील महिलांचे जीवन सक्षम केले आहे, आणि हे क्रांतिकारी कार्य गावातील महिलांच्या पाठबळाने वेगात सुरु आहे.

 

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.