Now Reading:
भारतातील मुलींची होतेय गळचेपी; देशातील एकूण महिलांपैकी फक्त २९% मुली वापरतात इंटरनेट
भारतातील मुलींची होतेय गळचेपी; देशातील एकूण महिलांपैकी फक्त २९% मुली वापरतात इंटरनेट

युनिसेफच्या ‘जगातील बालकांची परिस्थिती २०१७’ या अहवालानुसार भारतामध्ये इंटरनेटच्या वापरात अजूनही मुलींचं प्रमाण कमी आहे.

डिजिटल दुनियेतील विषमता-

भारतातील एकूण लोकसंख्येमध्ये महिलांचे प्रमाण ४८.५ टक्के आहे आणि त्यातील ७१ टक्के स्त्री वर्ग इंटरनेट वापरत नाही. देशातील डिजिटल क्षेत्र ग्रामीण भागात शिरकाव करण्याचा प्रयत्न करतंय. पण माहितीचा प्रसार करताना ही माहिती समोर आली की बहुतेक मुलींना फोन व इंटरनेटसारख्या सर्वसामान्य सुविधांपासून वंचित ठेवलं जातं.

प्रगतीच्या पंखांची छाटणी-

महिलांना या माहितीच्या महासागरापासून दूर ठेवल्याने त्यांच्यापासून तंत्रशिक्षण, माहिती व प्रगतीच्या शेकडो संधी हिरावून घेतल्या जात आहेत. जणू काही महिलांच्या प्रगतीचे पंख छाटून टाकले जात आहेत. महिलांना जर हे माहिती, संवाद आणि संपर्काचं दालन खुलं करून दिलं तर त्या जागतिक पातळीवर तसेच आर्थिक बाजारपेठेवर देशाचं नाव उंचावू शकतात. पण काही जुनाट विचार, चालीरिती याच्या आड येतायत ही खरंच खंत बाळगण्याची गोष्ट आहे.

“भारतातील मुलामुलींना डिजिटल दुनियेतून मिळणाऱ्या माहितीचा समान फायदा व्हायला हवा. भारत हे एक प्रसिद्ध IT (माहिती तंत्रज्ञानाचे) केंद्र आहे. येथील मुलामुलींना त्याचा पुरेपूर फायदा घेता आला पाहिजे” – यास्मिन अली हक, युनिसेफ प्रतिनिधी.

सर्वांनी मिळून करायला हवे प्रयत्न-

ही डिजिटल दरी दूर करण्यासाठी नागरिकांना जागरूक करण्याची गरज आहे. सर्वच स्तरावर महिला कशा प्रगती करू शकतात हे पटवून द्यायला हवे. हे साध्य करण्यासाठी सरकार, खासगी क्षेत्र, परिवारजन व मुलं स्वतः या सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवं. इंटरनेटला एक सुरक्षित व फायदेशीर संसाधन  होण्यास मदत करायला हवी.

Input your search keywords and press Enter.