Now Reading:
रेहमानच्याही आधी ३५ वर्षापूर्वी या भारतीय महिलेने पटकावलाय आॅस्कर! कोण आहेत त्या? वाचा-
रेहमानच्याही आधी ३५ वर्षापूर्वी या भारतीय महिलेने पटकावलाय आॅस्कर! कोण आहेत त्या? वाचा-

२००९ मध्ये ए. आर. रेहमान, गुलझार व रेसुल पुकुट्टी यांना ‘स्लमडाॅग मिलिनेयर’साठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा अकॅडमी अवाॅर्ड (आॅस्कर) मिळाला तेव्हा संपूर्ण देशाने या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. पण क्वचितच कोणाला ठाऊक असेल की, तब्बल ३५ वर्षांपूर्वी एका भारतीय महिलेने हा पुरस्कार मिळवलेला.

१९८३ सालच्या आॅस्करमध्ये लाॅर्ड रिचर्ड अॅटनबोरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटासाठी भारताच्या भानू अथैया (Bhanu Athaiya) यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी आॅस्कर पुरस्कार देण्यात आलेला. भानू या आॅस्कर मिळवणाऱ्या एकमेव भारतीय महिला आहेत.

चकित झालात ना? मग जाणून घेऊया भारतीय सिनेसृष्टीत वेशभूषा क्षेत्रावर ५ दशके अधिराज्य गाजवलेल्या आॅस्कर विजेतीबद्दल-

१. भानूमती अण्णासाहेब राजोपाध्ये असे त्यांचे मुळ नाव. कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांचा जन्म. त्यांचे वडील अण्णासाहेब हे चित्रकार होते.

२. वडिलांकडून मिळवलेला हा कलेचा वारसा पुढे नेत त्यांनी मुंबईच्या सर जे जे स्कुल आॅफ आर्ट्समध्ये सुवर्ण पदकासहीत फाईन आर्ट्सची पदवी मिळवली.

३. ‘Eve’s Weekly’ या मासिकाच्या संपादकांनी स्वतःचं बुटीक उघडलं तेव्हा त्यांनी भानूसमोर कपडे डिझाइन करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी तो स्वीकारला आणि काही काळातच त्यांना त्यात गोडी निर्माण झाली.

४. जसजशी प्रसिद्धी मिळत गेली तशी सिनेतारकांची त्यांच्याकडे गर्दी होऊ लागली. यातूनच प्रोत्साहन घेऊन १९५६ साली गुरु दत्त यांच्या ‘सी. आय. डी.’ चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

५. गुरु दत्त यांच्या ‘प्यासा’, ‘चौदवी का चाँद’, ‘साहेब बिवी और गुलाम’ या चित्रपटांतील वेशभूषा त्यांनीच केलीय. पण त्यांना खऱ्याखुऱ्या स्वरुपाची प्रसिद्धी मिळाली ती १९८३ च्या आॅस्करमुळे.

६. ‘लेकिन’ (१९९१) आणि ‘लगान’ (२००१) या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. ‘स्वदेस’ (२००४) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

७. २०१० मध्ये त्यांनी ‘The Art of Costume Design’ हे पुस्तक प्रकाशित केलं. यात त्यांनी आपल्या दृष्टीकोनाचे विविध पैलू मांडलेत. भानू यांनी १९६०- ७० च्या दशकात फॅशन जगतात नवे ट्रेंड रचले व भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सन्मानाचे स्थान मिळवून दिले.

पाहा त्यांचा हा आॅस्कर स्वीकारतानाचा व्हिडीआे

Cover Image Source: MTV Coke Studio

H/T: The Better India

Input your search keywords and press Enter.