Now Reading:
ही २६ वर्षीय चायवाली ऑस्ट्रेलियामध्ये चहा विकून उंचावतेय भारताची मान
ही २६ वर्षीय चायवाली ऑस्ट्रेलियामध्ये चहा विकून उंचावतेय भारताची मान

प्रत्येक भारतीयाचा दिवस चहाने सुरु होतो. चहाशिवाय मराठी माणसाच्या अंगात तरतरी येत नाही. कंटाळा आला की चहा, कोणतही काम करायचं असेल तर पहिला चहा हा लागतोच! असा हा देसी चहा चक्क ऑस्ट्रेलियात एका भारतीय मुलीने पोहोचवला आहे.

या चहावालीचे नाव उप्पमा विर्दी असे आहे. २७ वर्षांची उप्पमा मूळ चंदीगढची असून ती एक वकील आहे. तिच्या आजोबांनी तिला आयुर्वेदिक चहाच्या विशेष गुणधर्मांची आणि चहा मसाल्यांची ओळख करून दिली. ऑस्ट्रेलियात वास्तव्य असलेल्या उप्पमाला २०१६ मध्ये बिजनेस वूमन ऑफ द इअरचा पुरस्कार मिळाला. उप्पमा गेल्या तीन वर्षांपासून चहा रिटेल व्यवसायात काम करत आहे. २०१७ ऑस्ट्रेलियन फोर्ब्सच्या टॉप ३० मध्ये तिचा उल्लेख करण्यात आला आहे.  

 

एक मुलाखतीत तर ती चक्क चहाची किटली घेऊन आली होती, आणि तिने सर्वांना चहा पाजला. ऑस्ट्रेलियातील या चहा व्यवसायाची सविस्तर माहिती तिच्या www.uppmavirdi.com वेबसाइटवर आहे. एका फायनान्स मासिकामध्ये उप्पमाने लिहिलेला भारत–ऑस्ट्रेलिया आर्थिक संबंधांवरील लेख प्रसिद्ध झाला होता.

 

धंद्यातील मेहनत, चहाचा दर्जा आणि सोशल माध्यमांचा वापर या सर्व गोष्टींच्या अचूक मिश्रणाने उप्पमा विर्दी हिने स्वत:सोबत प्रत्येक भारतीयाची एक वेगळी ओळख परदेशात निर्माण केली आहे. 

All Images have been taken from the Chaiwalli’s Intstagram

Input your search keywords and press Enter.