Now Reading:
वेटरची कामं, तीसुद्धा ‘विदाऊट टिप’ करणारा भारतातील पहिला यंत्रमानव!
वेटरची कामं, तीसुद्धा ‘विदाऊट टिप’ करणारा भारतातील पहिला यंत्रमानव!

लहान मुले आणि त्यांचा रोबोट. जिथे आपली पिढी शिक्षण पूर्ण करुन नोकरी धंद्याच्या मागे असणारी होती तिथेच बंगलोरच्या चार अल्पवयीन मुलांनी एक Robot (रोबोट) बनवला आहे. हा खेळण्यातील रोबोट नसून खराखुरा यंत्रमानव आहे. अर्जुन (१३), अनिश (१२) श्रीवास्तना (१३) आणि वर्षा (२०) या चार मुलांनी हा पराक्रम केला आहे.  

बंगळूरच्या व्हि.आर मॉलमध्ये लहान मुलांनी यंत्रमानवाचा अाविष्कार तयार केला.

बंगळूरच्या व्हि.आर मॉलमध्ये लहान मुलांनी हा अविष्कार तयार केला आहे. जिथे मुले आज mobile (मोबाईल) gadget (गॅजेट)च्या दुनियेत रमले असतानाच याच आजच्या पिढीतील मुलांनी ही कमाल करुन दाखविली आहे. ही मुले ‘किडोबोयॉटिक’ या स्टार्टअपचे सदस्य आहेत. येथे १२ ते १७ या वयोगटातील मुलांना रोबोट्स बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

या चार मुलांनी या प्रशिक्षणादरम्यान Bob (बॉब) नावाचा एक यंत्रमानव तयार केला. बॉबमध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर लावण्यात आले आहे. हा यंत्रमानव एका हॉटेलमध्ये वापरण्यात येत आहे. ग्राहकांनी एकदा ऑर्डर केल्यावर तो फूड काऊंटरपासून ते ग्राहकांंच्या टेबलपर्यंत सहज ऑर्डर घेऊन जाऊ शकतो. 

केवळ दोन महिन्यांमध्ये या चार मुलांनी हा यंत्रमानव तयार केला आहे. आणि तो यशस्वीपणे कार्यरत आहे. या स्टार्टअपचा मूळ उद्देश असा आहे की, येथे मुलांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही तरी नवीन शिकविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. 

आज भारतात अनेकजण तंत्रज्ञानाला दोष देतात. पण, या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास त्यामुळे आपली प्रगती शक्य होते हे लोकांना कळायला अजून बराच कालावधी द्यावा लागेल.

 Cover Image Source

Input your search keywords and press Enter.