Now Reading:
१ एप्रिलपासून आयकरमध्ये होणारे बदल
१ एप्रिलपासून आयकरमध्ये होणारे बदल

२०१८च्या अर्थसंकल्प भाषणात, अरुण जेटली यांनी विविध कर बदल केले आहेत जे १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. या कर बदलाचा अनेक प्रकारे करदात्यांवर परिणाम होईल. आयकराबाबत कायद्यांची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. १ एप्रिल २०१८ पासून लागू होणाऱ्या ५ आयकर बदलांबद्दल:

परिवहन भत्ता आणि वैद्यकीय परतफेड

नवीन कर बदलानुसार कर लाभापासून परिवहन भत्ता आणि वैद्यकीय परतफेड वगळण्यात आले आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजना

ही योजना ३१ मार्च , २०२० पर्यंत विस्तारित करण्याचा प्रस्ताव आहे. या बरोबरच जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नातील करसवलत मर्यादेत वाढ

नव्या नियमांनुसार ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नात मिळणाऱ्या करसवलत उत्पन्नाचा आकडा १०००० वरून ५०००० करण्यात आला आहे. यामध्ये फिक्स डिपोजिट आणि रिकरिंग डिपोजिटवरून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल.

जेष्ठ नागरिकांचा TDS

ज्येष्ठ नागरिकांचे व्याज उत्पन्न ५०,००० रुपयांपर्यंत असेल तर त्यांच्याकडून कोणत्याही टीडीएसची कपात केली जाणार नाही.

LTCG पुनःपरिचय

सरकारने इक्विटी गुंतवणुकीवर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर पुन्हा आणला आहे. इक्विटी शेअर, युनिट्स किंवा इक्विटी लिंक फंड यांसारखे लाभदायक भांडवल एक लाखावर गेल्यास त्यावर १० टक्के कर १ एप्रिलपासून लागू करण्यात येईल.

Input your search keywords and press Enter.