Now Reading:
‘मॅटर्निटी इन्शुरन्स’ घेईल तुमच्या खर्चाची काळजी, तुम्ही घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी
‘मॅटर्निटी इन्शुरन्स’ घेईल तुमच्या खर्चाची काळजी, तुम्ही घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी

घरात एक नवा सदस्य येणं जसं मोठ्या आनंदाचं असतं तसं ते खर्चिकही असतं. प्रसूतीच्या वेळी आई आणि बाळाच्या आरोग्याची काळजी डोक्यावर घोंगावत असताना चेकअप्स, रुग्णालयात दाखल होणं, गोळ्या आदींचा खर्च डोक्याभोवती घिरट्या घालतच असतो. अशा वेळी प्रसूती विमा म्हणजेच मॅटर्निटी इन्शुरन्स असणे मदतीचे असते.

 

‘मॅटर्निटी इन्शुरन्स’ म्हणजे काय?

तुम्ही जर मॅटर्निटी इन्शुरन्स काढला असेल तर प्रसूतीच्यावेळी (डिलिव्हरीच्या वेळी) हॉस्पिटलचा खर्च विमा कंपनी करतं. या अंतर्गत सर्वसामान्य आणि सिझेरिअन या दोन्ही प्रकारच्या डिलिव्हरीचा खर्च सांभाळला जातो.

 

मॅटर्निटी इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करण्याची आदर्श वेळ-

बऱ्याचदा महिला गर्भधारणा झाल्यानंतर मॅटर्निटी इन्शुरन्ससाठी अर्ज करतात. त्यामुळे तो अर्ज मंजूर होत नाही. बऱ्याच मॅटर्निटी इन्शुरन्सचा ३-४ वर्षाचा कालावधी असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा कुटुंब वाढवण्याचा विचार करता त्यावेळी लगेच मॅटर्निटी इन्शुरन्ससाठी अर्ज करावा. 

 

मॅटर्निटी इन्शुरन्सचे फायदे-

 

प्रत्येक इन्शुरन्स कंपनीच्या वेगवेगळ्या पॉलिसी असतात. बहुतेक पॉलिसीमध्ये खालील गोष्टी केलेल्या असतात.

१. हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या ३० दिवस आधी आणि नंतर ६० दिवसांचा मेडिकल खर्च

२. डिलिव्हरीचा खर्च

३. बाळाच्या जन्मापूर्वीचा आणि जन्मानंतरचा खर्च

४. रुग्णवाहिकेचा खर्च

५. पॉलिसी संपेपर्यंत नवजात बालकाचा विमा.

 

पॉलिसीतून वगळलेल्या तरतुदी-

१. ज्या डॉक्टरकडे तुम्ही नियमित चेकअपसाठी जाता त्या डॉक्टरांची फी.

२. मॅटर्निटी प्लॅनमध्ये नसलेल्या व्हिटॅमिन आणि टॉनिक्सचा खर्च

३. गर्भधारणेच्या ९ महिन्याच्या कालावधीतील निदान चाचण्या (diagnostic) आणि उपचाराचा खर्च

 

पॉलिसीच्या मर्यादा जाणून घ्या- 

तुम्ही काढलेल्या इन्शुरन्सच्या रक्कमेच्या वर खर्च गेल्यास तो खर्च तुम्हाला स्वतःच्या खिशातून करावा लागतो. उदा. दोन लाखांचा विमा असेल आणि खर्च तीन लाख झाला तर एक लाख रुपये तुम्हाला स्वतःच्या खिशातून भरावे लागतात.

 

Input your search keywords and press Enter.