Now Reading:
काखेतील त्वचेची काळजी घेण्याचे ५ उपाय जे तुम्ही करायलाच पाहिजेत
काखेतील त्वचेची काळजी घेण्याचे ५ उपाय जे तुम्ही करायलाच पाहिजेत

काखेतील त्वचा, शरीराच्या इतर त्वचेपेक्षा अधिक नाजूक असते. त्यामुळे त्याची काळजी घेणं अजून कठीण असतं. म्हणूनच काखेतील केस काढताना (Shave) काळजी घेणं गरजेचं असतं.

१. जर शेव्हिंग केलंत तर… 

काखेत जर रेझरने शेव्ह करायच झालं तर, प्रत्येक वेळा नवीन ब्लेड वापरा. काळजी घ्या की ते ब्लेड साफ आहे आणि गंजलेलं नाही.

२. हेअर रिमुव्हल क्रीम- 

सहसा हेअर रिमुव्हल क्रीम वापरणं टाळा, कारण त्याने त्वचा काळी पडू शकते. 

३. डिओड्रंट्स- 

असे डिओड्रंट्स वापरा ज्याच्यात दारूचा(Alcohol) वापर केला नसेल. यानेसुद्धा त्वचा काळपट पडू शकते. 

४. कापसाचे किंवा हलक्या कापडाचे कपडे वापरा-

यामुळे तुमच्या त्वचेला मऊ पणा मिळेल आणि त्रास होणार नाही. 

५. घरगुती स्क्रब-

नारळाच्या तेलात जराशी साखर मिसळून स्क्रब बनवा आणि हे तुमच्या काखेतल्या भागावर चोळा. याने काखेतील काळपटपणा जाण्यास मदत होईल.

६. टीशूज वापरा-

जर तुम्ही पूर्ण दिवस घराबाहेर राहणार असाल आणि तुमचं अंग खूप घामटण्याची काळजी वाटत असेल तर हा उपाय वापरून पहा. ३ ते ४  टीशूज एकमेकांवर ठेऊन, तुमच्या कपड्यांच्या आत प्रत्येक काखेत एक, असे ठेऊन द्या. टीशूज, सगळा घाम शोशून घेतील आणि तुम्ही पण दिवस भर फ्रेश राहाल.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.