Now Reading:
घरगुती ट्युशन सुरु करण्यासाठी ६ सोप्या टिप्स
घरगुती ट्युशन सुरु करण्यासाठी ६ सोप्या टिप्स

ज्या गृहिणींना रिकामी वेळात काहीतरी उद्योग करण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी मुलांचे ट्युशन घेणे हा घर बसल्या पैसे कमावण्याचा एक स्वस्त आणि शक्य पर्याय आहे. आता याची सुरुवात कशी करावी, तर त्यासाठीच आम्ही इथे आहोत ना! पुढे वाचा तर मग-

१. शैक्षणिक पात्रता-

तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही विविध वयोगटाच्या मुलांना शिकवू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले अगदी कॉलेजमधील मुलांनासुद्धा शिकवू शकतात.

अट एवढीच आहे की तुम्हाला विषयाचं ज्ञान व ते ज्ञान समजावून देण्याची कला अवगत हवी.

२. घरात सुरुवात-

छोटेखानी सुरुवात करायची असेल तर तुम्ही तुमच्या घरातच ट्युशन सुरु करू शकता. अशी खोली निवडा जेथे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होणार नाही. खोली ऐसपैस हवी जेणेकरून विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसावे लागणार नाही.

३. जाहिरात-

ट्युशन सुरु केल्यानंतर लोकांपर्यंत तुमचे नाव पोहोचणे गरजेचे आहे. तुम्ही सोसायटी, मित्रमंडळींमध्ये व्हॉट्सऍप किंवा फेसबुक मार्फत नोटीस पसरवू शकता. तुम्ही पॅम्प्लेट किंवा बॅनरद्वारे जाहिरात करू शकता.

४. व्यवसायाची वाढ करणे-

काही महिन्यांनी मुलांकरिता अॅडमिशन घेण्यासाठी तुम्हाला बरेच पालक येऊन भेटू लागतील. अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे स्टाफ नसेल तर छोट्या छोट्या तुकड्या करा. पण प्रत्येक तुकडीमध्ये २० पेक्षा जास्त विद्यार्थी असणार नाहीत याची काळजी घ्या. थोडा जम बसल्यावर तुम्ही शिक्षक संख्येत वाढ करू शकता. 

५. फी किती ठेवावी?

तुमची फी तुमच्या परिसराची आर्थिक पत, वयोगट, इयत्ता, तसेच अभ्यासक्रमावर अवलंबून असते. गरज वाटल्यास जवळपासच्या इतर ट्युशनमध्ये थोडी चौकशी करावी. फी ठरवताना तुमचे खर्च व स्टाफचे वेतन लक्षात ठेवावे

६. शिस्तबद्धता-

ट्युशनमध्ये सहसा शाळेच्या तुलनेत जास्तच मस्ती चालते. यासाठी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी स्वतःसाठी शिस्त व्यवस्थापनाचे (Disciplin management) प्रशिक्षण घ्यावे.

Input your search keywords and press Enter.