Now Reading:
५ पाऊले आर्थिक बचतीकडे
५ पाऊले आर्थिक बचतीकडे

पैशांची बचत करताना जाणीवपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असते. १० वर्षांपूर्वी जर काही विकत घायचं झालं तर बाजाराचा फेर फटका मारावा लागायचा. पण आता काळ बदलला आहे. मोबाइलवर दिवसात शेकडो जाहिराती पॉप अप होत असतात, जे तुमचं लक्ष विचलित करतात.

मग तुम्हाला कळण्या आधी तुम्ही मोबाइल स्क्रिनवरूनच शॉपिंग करण्यास सुरुवात करता. त्यात जर एखादी आकर्षक ऑफर असेल तर तुम्हीही काहीही विचार न करता लगेच वस्तू खरेदी करता. तुम्ही अनेकदा जर ऑनलाइन शॉपिंगच्या आहारी जात असाल तर ते थांंबवण्यासाठी तुमच्याकरिता काही उपाययोजना खालीलप्रमाणे.

१. वेबसाइटवर पाहुणे व्हा

ऑनलाइन वस्तू विकत घेताना ब्राउझरमध्ये “incognito mode”वर वेबसाइटची लिंक शोधा. याने तुमचा फोन cacheला ट्रॅक करून तुम्हाला पुढे समान जाहिराती नाही दाखवणार.

२. नोटिफिकेशन बंद ठेवा

तुमच्या मोबाइलच्या Setting मध्ये ( सेटिंग ) जाऊन अॅप नोटिफिकेशनचा पर्याय बंद करा. जेणेकरून तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत.  

३. दोन ई-मेल अकाउंट

शॉपिंग करण्यासाठी एक वेगळा ई-मेल आय.डी तयार कार. याने जाहिरात तुमच्या डोळ्यांसमोर नाही राहणार आणि तुमचं मन विचलित पण होणार नाही.

४. सेव्हिंग अकाउन्ट

महिन्याच्या सुरुवातीला सेव्हिंग अकाउन्ट खोला आणि हे पैसे फक्त अत्यंत गरजेच्या वेळेस वापरा.

५. गरजेच्याच वस्तूची खरेदी

ज्या वस्तूंचा तुम्हाला खरंच उपयोग होणार असेल अश्याच गोष्टी विकत घ्या. जाहिरात पाहून आकर्षित होऊ नये अश्याने उगीच खर्च वाढतो.

Input your search keywords and press Enter.