Now Reading:
असं लिंक करा तुमचं आधार कार्ड
असं लिंक करा तुमचं आधार कार्ड

सुप्रीम कोर्टाने बँक, मोबाइल क्रमांक, म्युचुअल फंड, पॅन कार्ड, इन्शुरन्स पॉलिसी आणि मतदान कार्ड (वोटर आयडी ) यांच्याशी आधार कार्ड जोडणं अनिवार्य केलं आहे. पण सरकारच्या या निर्णयाने घाबरून न जाणे. आम्ही तुम्हाला हे कसं करायचं ते शिकवणार आहोत. 

आधारला बँक अकाउंटशी कसं जोडाल?

तुम्ही तीन प्रकारे आधार कार्डला बँक खात्याशी जोडू शकता- १. बँकेत जाऊन २. इंटरनेट बँकिंग ३. मोबाईल बँकिंग अँप्लिकेशनद्वारे

जर तुम्ही ऑनलाईन ही प्रक्रिया करण्याचं ठरवलं तर-

१. सर्वात आधी तुमच्या ऑनलाईन बॅकिंग अकाउंटवर लॉगिन करा.

२. “अपडेट आधार” वर क्लिक करा.

३. तुमच्या आधारची माहिती भरा आणि “सबमीट” वर क्लिक करा.

४. शेवटी तुम्हाला एक “OTP” पाठवण्यात येईल, तो रजिस्टर करून घ्या, की झालं तुमचं आधार कार्ड लिंक.  

आधारला CAMS च्या म्युचुअल फंडशी कसं जोडायचं? 

१. सर्वात आधी- https://www.camsonline.com/InvestorServices/COL_Aadhar.aspx या लिंक वर जा.

२. त्यावर एक फॉर्म दिसेल, ज्यावर ई-मेल आय.डी, पॅन कार्ड, आधार आणि मोबाइल क्रमांक टाका.

३. सबमिट केल्यानंतर एक OTP येईल तोच टाकून रजिस्टर करा.

आधारला पॅन कार्डशी कसं जोडायचं?

१.इन्कम टॅक्सच्या या वेबसाइट वर जा- https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarHome.html

२. तुमचे पॅन आणि आधारची माहिती भरा.

आधारला इन्शुरन्स पॉलिसिशी कसं जोडायचं?

LIC: https://ebiz.licindia.in/D2CPM/#Login 

SBI Life Insurance: https://www.sbilife.co.in/en/aadhar-updation-form 

ICICI Prudential Life Insurance: https://www.iciciprulife.com/services/update-your-aadhaar.html 

Max Life Insurance: https://www.maxlifeinsurance.com/customer-service/aadhaar-registration.aspx

या लिंक्सवर जाऊन तुम्हाला माहिती भरावी लागेल.

आधारला मोबाइल क्रमांकाशी कसं जोडायचं?

तुमच्या मोबाइलच्या कस्टमर केअर सेंटरवर जाऊन तुम्ही आधारला मोबाइल क्रमांकाशी जोडू शकता.

Input your search keywords and press Enter.