Now Reading:
सोप्या पद्धतीने जाणून घ्या, ऑनलाइन आयकर भरण्याची प्रक्रिया
सोप्या पद्धतीने जाणून घ्या, ऑनलाइन आयकर भरण्याची प्रक्रिया

आयकर थकवणे कायद्याने गुन्हा आहे. तसे केल्यास तुमच्यावर कडक कार्यवाही केली जाऊ शकते. प्रथमदर्शी ही आयकर भरण्याची प्रकिया फार किचकट वाटते. पण डिजीटल क्रांतीमुळे तुमचा एक त्रास कमी होतोय. तुम्ही फक्त पाच मिनिटांत आयकर भरू शकता या सात सोप्या पायऱ्यांमध्ये..

१. आयकर विभागाच्या https://www.tin-nsdl.com/ संकेतस्थळाला भेट द्या. तुम्ही जर पुर्वीपासुनच या संकेतस्थळाचे सभासद आहात तर थेट ‘Login’ करा. http://www.tin-nsdl.com > Services > e-payment येथे जाऊन ‘Pay Taxes Online’ वर क्लिक करा.

२. संबंधित चलानची निवड करा. उदा. ITNS 280, ITNS 281, ITNS 282, ITNS 283, ITNS 284 किंवा फॉर्म 26 QB भरा (जे तुम्हाला लागू पडेल ते).

३. PAN क्रमांक व इतर आवश्यक माहिती भरा. उदा. करदात्याचा पत्ता, ज्या बॅंकेमार्फत पैसे भरलेत त्या बॅंकेचे नाव इ.

४. सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यावर, स्क्रिनवर माहिती पोच झाल्याचा संदेश येईल. सोबत करदात्याचं संपूर्ण नाव येईल.

५. त्यानंतर या संकेतस्थळावरूनच तुम्ही थेट बॅंकेच्या ‘net-banking’ संकेतस्थळावर जाल.

६. बॅंकेच्या ‘net-banking’ संकेतस्थळावर लॉग इन करून पैसे भरण्यासाठी आवश्यक माहिती भरा.

७. पैसे भरल्यावर चलान भरल्याची पावती स्क्रिनवर दिसेल. ही पावती तुम्ही कर भरल्याचा पुरावा आहे.

Input your search keywords and press Enter.