Now Reading:
झटपट साडी नेसण्याच्या सोप्या स्टेप्स
झटपट साडी नेसण्याच्या सोप्या स्टेप्स

भारतात साडी नेसण्याचे अनेक प्रकार आहेत. जसा प्रदेश, तसा प्रकार!

१. महाराष्ट्रीय प्रकार

२. केरळातील प्रकार

३. मुमताजसारखा प्रकार

४. जलपरीसारखा प्रकार

५. लेहेंगा प्रकार 

 

पण जर कोणत्या कार्यक्रमासाठी तुम्हाला अगदी सोप्या प्रकारे साडी नेसायची झाली तर, तुमच्यासाठी हे फार उपयोगाचे ठरेल. मग कसली वाट पाहताय चला शिकूया स्टेप बाय स्टेप साडी नेसायला.

सगळ्यात आधी ब्लाउज आणि परकर घालून घ्या. शक्यतो ज्या रंगाची साडी आहे त्याच रंगाचा परकर घाला. परकरची गाठ कमरेला घट्ट बांधून घ्या. 

 

स्टेप १:

सगळ्यात आधी साडीचे शेवटचे (पदराचा भाग नाही) टोक घ्या आणि बेंबीच्या जवळ परकरमध्ये गुंडाळा. अशाप्रकारे दोन फेरे घालून साडी कमरेभोवती गुंडाळा. 

स्टेप २:

त्यानंतर पदर खांद्यावर टाकून उरलेल्या साडीच्या १-२ इंचाच्या ३-४ निऱ्या घालून घ्या आणि बेंबीकडे खोचा.  

स्टेप ३:

आता पदराचा भाग घेऊन त्याला तुम्ही दोन प्रकारे सोडू शकता. एक तर तुम्ही पदर मोकळा सोडू शकता, नाही तर खांद्यावर एक पिन लावून पदर ठेऊ शकता.

Input your search keywords and press Enter.