Now Reading:
घ्या तुमच्या नाजूक पावलांची काळजी घरच्या घरी
घ्या तुमच्या नाजूक पावलांची काळजी घरच्या घरी

दिवसभरात आपण खूप गोष्टींची काळजी करत असतो. पण स्वतःची काळजी घायला आपण कंटाळा करतो. पण स्वतःच्या शरीरासाठी थोडासा वेळ दिलात तर, तुम्हालाच बरं वाटेल. तुमच्या नाजूक पायांची काळजी तुम्ही सहसा घेत नसाल. पण आठवड्यातून एकदा तरी त्यांच्यासाठी वेळ काढा, जेणे करून ते त्यांचं सौंदर्य गमावणार नाहीत.

 

१. घरगुती पेडिक्युर (Pedicure)-

– सगळ्यात आधी नखं कापून घ्या.

– थोडंसं मध घेऊन त्याने नखांवर मसाज करा.

– मग गरम पाण्यात लिंबू पिळून त्यात पाय सोडा. पाय आणि नखं नीट चोळून घ्या.

– पाण्यातून पाय बाहेर काढून स्वच्छ पुसून घ्या आणि त्यावर क्रीम लावून लावा, म्हणजे ते अजून मऊ होतील.

 

२. थकलेल्या पायांसाठी-

– कॅस्टर ऑइलने (एरंडेल तेल) पायांना मसाज करून ते १० मिनिटे तसेच ठेवा.

– त्यानंतर पाण्याने पाय धुऊन त्यावर लिंबाच्या क्रीमने मसाज करा.

 

३. घासलेल्या टाचा-

– टाचा कुकुटच्या (हा खडबडीत दगड कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात उपलब्ध असतो) दगडाने घासून घ्या.

– टाचांवर चंदनाच्या तेलाने मसाज करून, या क्रियेक पायांनी तेल शोषून घेणे गरजेचे आहे.

Input your search keywords and press Enter.