Now Reading:
आता निर्दोषपणे लावा आयलायनर ; दिसा आणखी सुरेख
आता निर्दोषपणे लावा आयलायनर ; दिसा आणखी सुरेख

किती वेळा तुम्ही आयलायनर लावायला गेलात आणि ते पसरून डोळे, पापण्या काळवंडल्या? इथे सांगितलेल्या काही युक्त्या वापरा आणि अधिक सुंदर दिसा. 

अनेक ब्रँड्सचे आयलायनर बाजारात विकत मिळतात यातही ३ प्रकार असतात.

 

१. जेल आयलायनर

२. लिक्विड आयलायनर

३. पेन्सिल आयलायनर

 

दिवसातले ५-१० मिनिटे असे घालवा ज्याने तुमचं आयलायनर राहील दिवसभर देखणं. आयलायनर लावताना या स्टेप्स वापरा-

 

१. स्टेप १:-

सगळ्यात आधी डोळ्यांच्या खाली मॉइस्चराईझर किंवा डोळ्यांसाठी असलेली क्रीम लावा. जर चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा त्वचा लाल झाली असेल तर क्रीम लावल्याने ती व्यवस्थित होते.

 

२. स्टेप २:-

चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि एक सारखी झाली की आयलायनरने डोळ्याचच्या कढेने एक नाजुकशी लाइन ओढा. जर ही ओळ नीट झाली तर तिला अजून थोडी जाड करा. आयलायनर सुकू द्या, त्यानंतर दोन्ही डोळ्यांवर एकसारखे लायनर लागले आहे की नाही ते बघा.

 

३. स्टेप ३:-

आयलायनरची ओळ पापण्यांपेक्षा लांब खेचा. तुमच्या डोळ्यांना पंख जोडलेत असे वाटू द्या. 

 

४. स्टेप ४:-

आता फक्त काजळ आणि खालच्या पापण्यांना मस्कारा लावा. एवढं केल्याने तुम्हाला मिळतील दररोज सुंदर डोळे जे देतील तुम्हाला एक वेगळी ओळख.

Input your search keywords and press Enter.