Now Reading:
टॉवेल, बेडशीट्स नेमक्या किती वेळा धुणे गरजेचे?
टॉवेल, बेडशीट्स नेमक्या किती वेळा धुणे गरजेचे?

एकदा कपडे वापरल्यानंतर आपण ते न विसरता धुतो. मग बेडशीट, टॉवेल धुण्यामध्ये आळस का? रोजच्या वापरातील टॉवेल, उशीचे कव्हर, स्वयंपाकघरातील कपडा नियमितपणे धुतल्याने आजारपणाची शक्यता कमी होते. या गोष्टी किती दिवसांच्या अंतराने धुवाव्या आणि का धुवाव्यात ते जाणून घेऊया-

अंघोळीचे टॉवेल – Bath Towel
(दर ३-४ वापरानंतर धुवा)

अंघोळीचे टॉवेल ३-४ वेळा वापरल्यानंतर त्यास दुर्गंध येतो. विशेषतः त्यांना रितसर सुकवले नाही तर त्यांना दुर्गंधी सुटते. व्यायामशाळेत जाणारे किंवा अंगमेहनतीचे काम करणाऱ्यांनी त्यांचे टॉवेल याहून जास्तवेळा धुणे गरजेचे असते. तसेच आपले टॉवेल इतर कोणासोबतच शेअर करु नये. टॉवेल वापरण्यायोग्य राहिले नसल्यास ते फेकून द्यावे.

बेडशीट – Bedsheets
(दर १-२ आठवड्यांनी धुवा)

प्रत्येक घरातील बेडशीट विविध प्रकारच्या घटकांचा सामना करत असते. बेडशीटवर झोपल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटत असल्यास ती धुण्याची गरज नाही. घरात आजारी व्यक्ती असल्यास किंवा तुम्हाला उघडे झोपण्याची सवय असल्यास बेडशीट नियमितपणे धुणे गरजेचे आहे.

भांडी पुसण्याचे कपडे – Kitchen Cloth
(दररोज धुवा)

स्वयंपाकघरातील कपड्यावर पदार्थ किंवा तेलाचे डाग पडतात. तसेच, फार काळ वापरात असल्याने त्यावर जंतू जमा होण्याची शक्यता असते. यासाठी स्वयंपाकघरात वापरात असलेले कपडे रोजच्या रोज धुवावे. अन्यथा आजारपण पसरण्याची शक्यता असते.

हात पुसण्याचे टॉवेल – Hand And Face Towel
(दर २-३ दिवसांनी धुवा)

सहसा कुटुंबातील सर्व सदस्य एकच टॉवेल वापरतात. तसेच टॉवेलचा वापर वारंवार होत असल्याने किमान दोन दिवसांनी ते धुणे गरजेचे असते.

पडदे – Curtain
(दर २-३ महिन्यानंतर धुवा)

पडद्यांवर डाग पडण्याची शक्यता कमी असते. परंतु, बाहेरुन येणारी धूळ आणि इतर दुषित घटक त्यांच्यावर जमा होत असतात. यासाठी काही महिन्यांनी पडदे धुणे आवश्यक आहे. जास्त वेळा पडदे धुणे पण चांगली गोष्ट नाही. यामुळे त्यांचे धागे कमकुवत होऊ शकतात.

उशीचे कव्हर – Pillow Covers
(दर २ आठवड्यांनी धुवा)

उशीवर आपल्या शरीरावरील जंतू जमण्याची शक्यता असते. तसेच घरात रुग्ण असल्यास कव्हर वारंवार धुणे आवश्यक आहे. धुतल्यानंतर उशीवर कव्हर चढवण्याआधी ते पूर्णतः कोरडे असल्याची खात्री करा.

आहे ना फायद्याचे? यापुढे टॉवेल, उशा वापरताना काळजी घेणार ना?

Cover Image Source: YouTube

Input your search keywords and press Enter.