Now Reading:
नेमकं किती पाणी प्यावं जेणेकरून शरीराला इजा होणार नाही?
नेमकं किती पाणी प्यावं जेणेकरून शरीराला इजा होणार नाही?

आपल्याकडे सतत म्हटलं जातं की दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं. पण खबरदार! जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या अवयवांना इजा होऊ शकते. त्याविषयी जाणून घेऊया.

पाण्याचे परिणाम-

शरिरातील हानिकारक सत्वांना बाहेर फेकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तसेच अवयवांच्या योग्य चलनासाठी पाण्याची आवश्यकता असते. चयापचय तसेच रक्तपेशींसाठी पाण्याची आवश्यकता असते. पण जर गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलं तर शरिरातील रक्ताचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे नसांवरती तसेच हृदयावर दबाव वाढतो.

किडनी व मेंदूला धोका-

किडनी शरिरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचं काम करतं. पण जर पाण्याचं प्रमाण अगदीच वाढलं तर किडनी निकामी होते. कालांतराने किडनीचं इतकं नुकसान होतं की उपचारही होऊ शकत नाही.

जर तुम्ही कमी वेळात जास्त पाणी प्यायलात तर तुमच्या पेशी फुगू शकतात आणि जर हे अतिरिक्त पाणी तुमच्या मेंदूतील पेशींमध्ये शिरलं तर तुम्हाला जीवही गमवावा लागू शकतो.

पण मग पाण्याची नेमकी गरज किती?

प्रत्येकाची पाण्याची गरज त्यांच्या शरीरानुसार बदलते. पुरुषांना ३ लिटर तर महिलांना २.२ लिटर पाण्याची गरज असते. जे व्यायाम करतात त्यांना पाण्याची गरज जास्त असते कारण त्यांना जास्त घाम येतो. तर तुमच्या राहत्या ठिकाणच्या हवामानावर तुमच्या पाण्याची गरज अवलंबून असते. इतरांच्या पाण्याच्या सेवनाच्या प्रमाणावर जाऊ नका. स्वतःच्या शरीराला समजून घ्या आणि त्यानुसारच पाणी प्या. कारण त्यांच्यासाठी जे योग्य प्रमाण असेल ते तुमच्यासाठी जास्त असू शकते.

Input your search keywords and press Enter.