Now Reading:
घरच्याघरी १० मिनिटात सर्दीला पळवून लावा
घरच्याघरी १० मिनिटात सर्दीला पळवून लावा

थोडी काय हवा बदलली की लगेच ताप, सर्दीचा त्रास होतो. प्रत्येक गोष्टीला काय डॉक्टरांकडे जायचे. सर्वसामान्य सर्दी असल्यास तुम्ही घरगुती काढा करुनही सर्दीला पळवून लावू शकता. वाचा ही घरगुती काढ्याची कृती.

साहित्य

आलं, दालचिनी, बडीशेप, मध, व्हिनेगर, लिंबू, पाणी

कृती

चार इंच आलं घ्या.

आलं व्यवस्थित धुवून बारीक कापा.

४ पेले पाण्यात आलं, २ दालचिनी, २ बडीशेप घालून उकळा.

उकळल्यावर १० मिनिटे थंड करत ठेवा.

उकळलेलं मिश्रण गाळून घ्या.

त्यात २ चमचे मध, २ चमचे व्हिनेगर व अर्ध्या लिंबाचा रस घाला.

काढा कसा घ्यावा?

तयार काढा तुम्ही गरम किंवा साधारण थंड असताना घेऊ शकता. हा काढा तुमच्या सर्दी खोकल्यावर रामबाण इलाज आहे.

काढ्यातील पोषकतत्त्वे

आलं आणि दालचिनी तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तर मध आणि बडीशेपमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात.

काढ्याची साठवण

हा काढा तुम्ही फ्रिजमध्ये दोन दिवसापर्यंत ठेवू शकता. त्यानंतर पुन्हा नविन काढा बनवावा लागेल.

Cover Image Source: Unsplash 

Input your search keywords and press Enter.