Now Reading:
केस गळतीवर ५ रामबाण उपाय तेसुद्धा घरच्या घरी
केस गळतीवर ५ रामबाण उपाय तेसुद्धा घरच्या घरी

केस गळतीने जवळपास सगळ्यांनाच ग्रासलंय. त्यात बाजारात एकापेक्षा एक केसांची उत्पादने उपलब्ध आहेत. यातलं मग काय घ्यावं, काय घेऊ नये, मग त्यांचे इतर दुष्परिणाम? ही एक वेगळी पंचाईत. या एवढ्या सगळ्या प्रश्नांनी भंडावल्यामुळे नव्याने केसगळती होईल ती वेगळी.

माझं ऐकाल? खाली काही सहजशक्य उपायांची यादी आहे, ज्यामुळे तुम्ही घरगुती पद्धतीने केसगळती रोखू शकता.

१. मेथी

मेथीचे दाणे खोबरेल तेलात परतून हे मिश्रण थंड करा आणि नंतर ते व्यवस्थित ढवळा. हे तेल केसांच्या मुळांना लावा. असे महिन्यातून एक ते दोन वेळा केल्याने केसांची वाढ सुधारते. तसेच, केसांची चकाकी परत येते.

२. अंड्याचे मास्क

अंडे फोडून त्याचा पिवळा बलक आणि पांढरा भाग वेगळा करा. त्यानंतर अंड्याचा पांढरा भाग व्यवस्थित एकसंध होईपर्यंत ढवळा. हे मिश्रण मेहंदीच्या ब्रशने केसांना लावा. डोकं शॉवर कॅपने झाका आणि वीस मिनिटांनी शॅम्पूने केस धुवा.

३. मेहंदी

२५० मिली मोहरीच्या तेलात धुवून सुकवलेली मेहंदीची पाने करपेपर्यंत शिजवा. तयार मिश्रण कपड्याने गाळा व हवाबंद बरणीत ठेवा. तयार तेल नियमितपणे केसांना लावा.

४. मध, दालचिनी आणि ऑलिव्ह ऑइल

हे तिनही घटक एकत्र करून एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण आठवड्यातून एकदा केसांना लावल्याने केस गळती थांबते.

५. कडीपत्ता

कडीपत्ता केसांच्या पोषणासाठी टॉनिकचे काम करते. तुम्ही केसांसाठी वापरत असलेल्या तेलामध्ये कडीपत्ता उकडा. तेल थंड झाल्यानंतर त्याने हळूवारपणे केसांना मालिश करा. असे आठवड्यातून दोनदा करा.

Input your search keywords and press Enter.