Now Reading:
घरच्या घरी घ्या तुमच्या नाजूक तळव्यांची काळजी
घरच्या घरी घ्या तुमच्या नाजूक तळव्यांची काळजी

दिवसभरात आपण खूप गोष्टींची काळजी करत असतो. पण स्वतःची काळजी घायला आपण कंटाळा करतो. पण स्वतःच्या शरीरासाठी थोडासा वेळ दिलात तर, तुम्हालाच बरं वाटेल. तुमच्या पायांच्या तळव्यांची काळजी तुम्ही सहसा घेत नसाल. पण आठवड्यातून एकदा तरी त्यांच्यासाठी वेळ काढा, जेणेकरून ते त्यांचं सौंदर्य गमावणार नाहीत. यासाठी काही सोपे उपाय

 

१. घरगुती पेडिक्युर (Pedicure)-

– सगळ्यात आधी नखं कापून घ्या.

– थोडंसं मध घेऊन त्याने नखांवर मसाज करून घ्या.

– त्यानंतर एका टपात गरम पाणी घेऊन त्यात लिंबू पिळा आणि पाय ठेवा. त्याचवेळी पाय आणि नखं नीट चोळून घ्या.

– १० मिनिटांनी पाण्यातून पाय बाहेर काढून ते नीट पुसून घ्या. पायावर कोणतेही मोइस्चुराइजर लावा म्हणजे ते अजून मऊ होतील.

 

२. थकलेल्या पायांसाठी-

– एरंडेल तेलाने (castor oil) पायांना मसाज करून १० मिनिटे ते असेच ठेऊन द्या.

– पाण्याने पाय धुऊन घ्या आणि मग लिंबाच्या क्रीम ने त्यावर मसाज करा.

 

३. घासलेल्या टाचा-

– टाचा पाय घासण्याच्या दगडाने (pumice stone) घासून घ्या. हा दगड तुम्हाला ब्युटी सेंटर किंवा ब्युटी प्रॉडक्ट्सच्या दुकानात अगदी सहज मिळतो.

– टाचांवर चंदनाच्या तेलाने मसाज करून घ्या. हे तेल पायांनी शोषूण घेणे गरजेचे आहे.

Input your search keywords and press Enter.