Now Reading:
भारतात सर्वाधिक वेतन असलेल्या १० नोकऱ्या
भारतात सर्वाधिक वेतन असलेल्या १० नोकऱ्या

पूर्वीपासून काही नोकऱ्या अश्या आहेत ज्या काळ पुढे गेला तरी त्यांची मागणी मात्र कमी झालेली नाही. नोकरीच्या स्वपरुपात बदल झाले तरी त्या नोकरीची आवश्यता कमी झालेली नाही, किंबहुना ती वाढली आहे. खाली दिलेल्या काही क्षेत्रांमधील नोकरीच्या संधी आणि उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे. पात्र असलेल्या व्यक्ती या कामांसाठी अर्ज करू शकतात.

१. मुख्य जोखीम अधिकारी (चीफ रिस्क ऑफिसर, Chief Risk Officer)

इतर मंडळांबरोबर तुलना केली गेली तर संचालक मंडळामध्ये मुख्य रिस्क ऑफिसरच स्थान तसं नवीनच आहे. आर्थिक, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रात त्यांच्या भूमिकेत महत्त्वाची वाढ होताना दिसत आहे. मुख्य रिस्क ऑफिसर पदासाठी अत्यंत हुशार, व्यावसायिक, नेतृत्व गुण आणि संभाषण कौशल्य उत्तम असले पाहिले.

२. मुख्य वित्त अधिकारी (चिफ फायनान्शिअल ऑफिसर, Chief Financial Officer)

चिफ फायनान्शिअल ऑफिसर कंपनीचे अधिकारी आहेत ज्यांच्यावर कंपनीचे आर्थिक नियोजन, जोखमींचे व्यवस्थापन, रेकॉर्ड ठेवणे आणि आर्थिक अहवाल ठेवणे याचे व्यवस्थापन करण्याची प्राथमिक जबाबदारी असते. काही कंपन्यांमध्ये वरिष्ठांचे वेतन १-१. ५ कोटी रुपये असते तर काही मोठ्या कंपन्यामध्ये ३-४ कोटी इतके वेतन या अधिकाऱ्यांना दिले जाते.

३. संशोधन आणि विकास प्रमुख (आर अॅण्ड डी हेड, Head of R&D)

ऑटोमोटिव्ह, टेलिकॉम आणि फार्मासिटिकल्ससारख्या क्षेत्रात संशोधन आणि विकास प्रमुखांची सर्व स्तरांवर मागणी आहे. यांचे वेतन १०-२५ लाखांपर्यंत असू शकतं.

४. सचिव (कंपनी सेक्रेटरी, Company Secretary)

कंपनीचा सेक्रेटरी एखाद्या खाजगी क्षेत्रातील कंपनी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थेमध्ये वरिष्ठ पदावर असतो. कामाच्या अनुभवानुसार त्यांचं वेतन ३५ लाखांपासून २ कोटी पर्यंत असू शकतं.

५. मुख्य डिजिटल अधिकारी (चीफ डिजिटल ऑफिसर, Chief Digital Officer)

हा अधिकारी कंपनीतील एक व्यक्ती असतो जो डिजिटल माध्यमाने कंपनीची वाढ घडवतो. यांचं वेतन ७५ लाखापासून १.५ कोटीपर्यंत जाऊ शकतं.

६. मुख्य माहिती अधिकारी (चीफ इन्फॉर्मेशन, ऑफिसर CIO)

चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर आय.टी (माहिती तंत्रज्ञान)कंपनीमध्ये वरिष्ठ कार्यकारी असतो. येत्या काही वर्षात या नोकरीची मागणी अजून वाढणार आहे असे अनुमान करण्यात आले आहे. यांचं वेतन ७५ लाखापासून १.५ कोटीपर्यंत असतं.

७. कायदेशीर वकील (लीगल काउन्सिल Legal Counsel)

वकिलांचा १४-१६ वर्षांचा अनुभव त्यांना ७५ लाख ते ४ कोटी पर्यंत वेतन मिळवून देऊ शकतं.

८. मुख्य उत्पादक अधिकारी (चीफ प्रॉडक्ट ऑफिसर, Chief Product Officer)

येत्या काही वर्षांत जिथे जिथे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय त्या क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची मागणी चालूच राहिल. अनुभवानुसार मुख्य उत्पादक अधिकाऱ्याचे वेतन १.५ ते ५ कोटींपर्यंत असतं.

९. सायबर आणि माहिती सुरक्षा तज्ज्ञ (सायबर अॅण्ड इन्फॉर्मेशन सेक्युरिटी प्रोफेशनल्स, Cyber and Information Security Professionals)

बँका, विमा कंपन्या, वीज, पेमेंट वॉलेट, दूरसंचार आणि आरोग्य सेवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये ग्राहकांची माहिती (Consumer Data) वापरली जाते. यामुळे आता सायबर क्राइमचा धोका वाढला आहे. या क्षेत्रात उत्कृष्ट असलेल्या व्यक्तींना २५ लाख ते १.५ कोटींपर्यंत वेतन मिळते. 

१०. मुख्य ऑडिट कार्यकारी (चीफ ऑडिट एक्सिक्युटिव्ह, Chief Audit Executive)

कंपनी छोटी किंवा मोठी असो चीफ ऑडिट एक्सिक्युटिव्हची गरज प्रत्येक कंपनीला असते. यांचं वेतन कंपनीनुसार ७५ लाख ते २.५ कोटीपर्यंत असतं.

Input your search keywords and press Enter.