Now Reading:
सिनेमागृहातील खाद्यपदार्थ एवढे महाग का असतात भाऊ?
सिनेमागृहातील खाद्यपदार्थ एवढे महाग का असतात भाऊ?

महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सिनेमागृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास प्रेक्षकांना परवानगी दिली. त्यामुळे चित्रपट बघायला गेल्यावर तेथील महागडे पदार्थ खाण्याऐवजी प्रेक्षक स्वतःच्या आवडीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. पण कधी विचार केला आहे का? सिनेमागृहातील खाद्यपदार्थांच्या किंमती नेहमी जास्त का असतात? चला तर मग यामागील कारण जाणून घेऊया-

मासनिक खेळ

जेव्हा कोणी सिनेमागृहात चित्रपट बघायला जातात त्यावेळी चित्रपटाचा आनंद घेण्यासोबतच काहीतरी चटरपटर खायला सगळ्यांनाच आवडते. या लोकांच्या मानसिकतेचा फायदा सिनेमागृहातील विक्रेते घेतात. त्यामुळे पॉपकॉर्न अथवा कोल्डड्रींक सारखे पदार्थ ते वाजवी भावात विकतात. तसेच स्वतःच्या कुटुंबासोबत आलेली मंडळी आपल्या लहानग्यांचा हट्ट पुरवताना पैशांचा विचार करत नाहीत असे गणित त्यामागे विक्रेत्यांनी केलेले असते.

आर्थिक गणित

सिनेमागृहात खाद्यपदार्थांचे भाव वाढवण्यामागे बरीच आर्थिक गणिते असतात. बाहेरील खाद्यपदार्थ आत नेण्यास बंदी घातली असल्यामुळे प्रेक्षकांना सिनेमागृहातूनच खाद्यपदार्थ विकत घेणे भाग पडते. सिनेमाचे तिकिट काढून जो सिनेमा बघितला जातो त्यातून सिनेमागृहाला जास्त नफा मिळत नाही. त्यामुळे विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमधून मिळणाऱ्या नफ्यातून सिनेमागृह चालवली जातात. तसेच सिनेमागृहात नेहमी बाहेरील कंत्राटदारांना खाद्यपदार्थ पुरवण्याचे कंत्राट दिलेले असते. या कंत्राटासाठी सिनेमागृहचालक खूप पैसे घेतात. त्यामुळे गुंतवलेले पैसे वसूल करण्यासाठी कंत्राटदारांना वाजवी दरात खाद्यपदार्थ विकणे भाग पडते.

सर्वसामान्यांच्या खिशाला नेहमी छिद्र पाडणाऱ्या या यंत्रणेवर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने आता सिनेमागृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी दिली आहे.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.