Now Reading:
५ टिप्स ज्या परीक्षेच्या काळात तुमच्या मुलांना येतील कामी
५ टिप्स ज्या परीक्षेच्या काळात तुमच्या मुलांना येतील कामी

“परीक्षा शिक्षणाचं प्रमाण मोजू शकत नाही, ते फक्त एका इयत्तेतील अभ्यासक्रम मापू शकतं.”

परीक्षेचा काळ जवळ येताच घरातील वातावरण बदलत जातं. मुलांचे हात पुस्तकांवर कार्यरत आणि तुमचे देवा पुढे जोडलेले! त्यांच्या आणि तुमच्या तणावाला तोड नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आणलेत असे उपाय ज्याने परीक्षेच्या काळात म्हणाल ‘आल इज वेल’

१. वेळ आणि जागा ठरवा-

दिवसातील एक वेळ ठरवून अभ्यासाला नेमला तर अभ्यासात गती येऊ शकते. त्याच बरोबर एक जागा ठरवली तर शिस्त पण लागते. ह्या वेळात अभ्यास पूर्ण झाला तर दुसरं काम किंवा मजा मस्ती करण्यासाठी बाकीचा मोकळा वेळ मिळतो. दोन्ही कामात समतोल ( Balance ) राखला तर डोकं पण शांत राहत.

२. वस्तू जागेवर ठेवणे-

पुस्तकं, पेन, पेन्सिल, खोडरबर आणि अभ्यास करताना लागणारे इतर साधन एका जागेवर व्यवस्थित ठेवले असतील तर गरज लागल्यावर तुम्ही ते शोधण्यात वेळ नाही गमावणार. 

३. अभ्यासाला बनवा मजेशीर-

काही मुलांना शांततेत अभ्यास करायला आवडतो. पण काही मुलांना थोड्याश्या आवाजात अभ्यास करायाला आवडतो. जेणेकरून त्यांना एकटेपणाची जाणीव नाही येणार. तुम्ही कमी आवाजात संगीत लावू शकता, पण शब्द असलेली गाणी टाळा. अभ्यासातून लक्ष विचलित होईल असं संगीत लावू नये.

४. पॉइंटर्स-

जेव्हा मोठी मोठी उत्तर पाठ करायची वेळ येते, खूप मुलं घाबरतात. पण मोठ्या उत्तरातून पॉइंटर्स काढले तर उत्तर लक्षात ठेवायला मदत होईल.

५. गणित सोडवताना-

गणित हा असा विषय आहे ज्यात नुसतं वाचून चालत नाही. पण सारखं सारखं सराव करून गणित सोडवताना मदत होऊ शकते.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.