Now Reading:
मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होत असेल तर काय कराल?
मासिक पाळीत अधिक रक्तस्राव होत असेल तर काय कराल?

साधारण वयाच्या दहाव्या वर्षापासून कधीही पाळी सुरू होते. काही वेळा रक्तस्त्राव अधिक असतो तर काही वेळा तो अगदीच कमी असतो. स्त्राव साफ असणे हो आरोग्यासाठी महत्वाचे असते. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या अती रक्तस्त्रावाला वैद्यकीय भाषेत मेनोरेहागिया (Menorrhagia) असे म्हटले जाते. अती रतस्राव होतोय म्हणजे काही तरी गंभीर कारण असेल असं काही नाही. पण यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो.

अतिरक्तस्रावाचा त्रास हा वेगवेगळ्या पद्धतीने जाणवतो. काहीजणींना पाळी व्यवस्थित महिन्याने येते, परंतु २ ते ३ दिवसानंतर हा रक्तस्राव वाढून सातव्या दिवशी बंद होतो. काही जणींना मासिक पाळी सुरळीत येते. पाच दिवसांनी रक्तस्राव बंद झाला तरी पुन्हा आठ दिवसांनी हा रक्तस्राव सुरू होतो. काहीजणींना सतत दहा दिवसापर्यंत अधिक प्रमाणात रक्तस्राव सुरूच राहतो. काहीना महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येते. प्रत्येकी तीन ते चार दिवस रक्तस्राव भरपूर प्रमाणात होतो.

अतिरिक्त रतस्रावाची लक्षणे

मासिक पाळीचा काळ ७ दिवसांपेक्षा जास्त वाढणे आणि प्रमाणापेक्षा अधिक सॅनिटरी पॅड्स लागणे.

अशी घ्या काळजी

१. आयबॉप्रोफेन नावाची गोळी घेतल्याने पाळीत होणारा त्रास आणि पोटदुखी कमी होण्यास मदत होतो. मासिक पाळीच्या आधी कोणत्याही प्रकारची गोळी घेणं टाळा. कारण त्यामुळे रतस्राव अधिक होण्याची शक्यता असते.

२. जर तुम्ही संपूर्ण दिवस बाहेर राहणार असाल तर जास्त सॅनिटरी पॅड्स सोबत बाळगा.

३. अधिक रक्तस्रावासाठी मोठ्या आकाराचे पॅड्स वापरा. ३-४ तासाने पॅड्स बदलत राहा जेणेकरून, संसर्गाचा धोका कमी होईल.

४. मासिक पाळीत हॉर्मोन्सचं असंतुलन होतं. आहारात भाज्यांचा समावेश असू द्या आणि अरबट-चरबट खाणं टाळा. त्याचसोबत नियमित व्यायामाची सवय शरीराला लावा.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.