Now Reading:
नुकत्याच माता झालेल्या स्त्रियांसाठी स्तनपानाचे ५ फायदे
नुकत्याच माता झालेल्या स्त्रियांसाठी स्तनपानाचे ५ फायदे

आई आणि बाळाचं नातं सगळ्याच नात्यांच्या पलीकडे असतं. चिमुकल्या बाळाने काहीही न बोलताच त्याची प्रत्येक गरज आईला कळते. नव्या मातांना बाळाची भूक समजते, पण त्यांना स्तनपानाची भीती वाटू शकते. कारण सहसा असं समजलं जातं की आई झाल्यावर स्तनपान नैसर्गिकरित्या होतं. पण प्रत्येक वेळेला असंच होईल असं नाही. स्तनपान कार्याला वेळ आणि सरावाची गरज असते.  

स्तनपानाचे अनेक फायदे बाळ आणि आईला होतात. हे फायदे जाणून घ्या:

१. जवळीक-

स्तनपानामुळे आई आणि मुलामध्ये जवळीक निर्माण होते. जवळीकीमुळे दोघांच्या शरीरात ‘ओक्सयटॉसिन’ नावाचं हॉर्मोन तयार होतं ज्यामुळे दोघांमधील बॉण्डिंग वाढते.

२. मेंदूची वाढ-

वैज्ञानिक शोधानुसार स्तनपानामुळे मुलाच्या मेंदूची वाढ जास्त प्रमाणात होते. 

३. जुलाबावर प्रतिबंध-

स्तनपानामुळे बाळाला जुलाब (डायरिया) होण्याची शक्यता कमी होते. बाळाला टाईप २ डायबिटिस होण्याची शक्यतासुद्धा यामुळे कमी होते.

४. प्रतिकारशक्ती वाढते-

स्तनपानामुळे बाळाच्या शरीरात अॅण्टीबायोटिक्स तयार होतात. यामुळे ते संसर्ग आणि जंतूंशी लढू शकतं. 

५. वजन कमी होण्यास मदत-

स्तनपान केल्याने प्रत्येक दिवशी मातांच्या ५०० कॅलरी घटतात. यामुळे गरोदरपणात वाढलेले मातांचे वजन कमी होण्यास मदत होते.

Input your search keywords and press Enter.