Now Reading:
४२००० मुलांना दहशतवादाविरोधात प्रोत्साहित करणारा IPS अधिकारी
४२००० मुलांना दहशतवादाविरोधात प्रोत्साहित करणारा IPS अधिकारी

देशातील किशोरवयीन गुन्हेगारांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB)च्या गुन्हेगारी अहवालात म्हटले आहे. हे धक्कादायक असले तरी, याच राज्यातील तरुणांमध्ये क्रांतिकारक बदल होत असल्याचे एक मोठे उदाहरण समोर आले आहे.

महाराष्ट्रातील तरुणांची हिंसक दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रचंड धक्कादायक घटनांमुळे राज्य पोलीस या समस्येला तोंड देण्यासाठी सतर्क झाले आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये पोलीस दलात आणि विद्यार्थ्यांमध्ये अधिक संवाद साधण्यासाठी एक प्रकल्प चालवण्यात येतोय. हळूहळू का होईना पण बदल घडून येत आहे. हा अमुलाग्र बदल आयपीएस अधिकारी हर्ष ए.पोद्दार यांच्या प्रयत्नांमुळेच घडतोय. गेल्या तीन वर्षांत गुन्हे आणि दहशतवादाविरोधात ४२००० तरुणांना तयार करण्याचा अद्वितीय पुढाकार एसपी मालेगावद्वारे घेण्यात आला.

हर्ष यांनी त्यांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय यश संपादित केले आहे. युरोप सरकारतर्फे देण्यात येणारी Chevening Scholarship ही शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. ‘इंटरनॅशनल अॅण्ड कॉन्स्टिट्युशनल लॉ’मधून त्यांनी मास्टर्स पूर्ण केले. मुख्य म्हणजे त्यांनी तब्बल दोनदा UPSC ची परीक्षा दिली आहे. पहिली परीक्षा त्यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिससाठी दिली. तर दुसऱ्यांदा २०१३ साली भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी परीक्षा देत ३६१वे स्थान मिळवले.

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी एक प्रकल्प हाती घेतला होता. यात त्यांनी अंध मुलांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती. इतर कार्यशाळांपेक्षा ही कार्यशाळा बरीच वेगळी होती. या मुलांना छोट्या छोट्या गटांमध्ये विभागून त्यांना गतीमंदासाठी वेगळे कायदे तयार करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही वर्षांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकांनी हर्ष यांना राज्यातील बालगुन्हेगारी कमी करण्याकरिता काही नाविन्यपूर्ण धोरणे सुचवण्यास सांगितली. यावर हर्ष यांनी दिलेल्या आयडियांना मंजुरी मिळाली आणि सुरुवात झाली ‘युथ पार्लामेंट चॅम्पियनशीप‘ची.

समाजविरोधी प्रवृत्तीविरोधात उभं राहण्याकरिता तरुणांना मंच उपलब्ध करून देणे हा त्यामागचा हेतू होता. उत्तम अधिकांऱ्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली हा मह्त्त्वपूर्ण उपक्रमाला औरंगाबादमधील शाळेत सुरुवात झाली. त्यामध्ये गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी मनात असलेले विचार समोर आणण्याची संधी या तरुणांना देण्यात आली. हर्ष यांच्या या उपक्रमाने प्रेरणा घेत इतर जिल्ह्यांमध्येही महाराष्ट्र पोलिसांनी याची सुरुवात केली. ही अतिशय साधी पण परिणामकारक कल्पना आजवर ४२००० तरुणांपर्यंत पोहचली असून, निदान ते हिंसेच्या मार्गावर जाणार नाहीत याची पूर्ण खात्री करून घेण्यात आली आहे.इतकेच नव्हे तर हर्ष यांनी स्नानिक विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा आणि करिअरसंबंदी विनामूल्य मार्गदर्शन करणा-या उडाण या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली.

Input your search keywords and press Enter.