Now Reading:
१० सेकंदात करा या १० हेअरस्टाइल्स
१० सेकंदात करा या १० हेअरस्टाइल्स

१. फॅन्ड आउट बन-

उन्हाने हैराण झाला असाल तर तुमच्या केसांना द्या एक नवा लूक. मोठ्या घनदाट केसांचा अंबाडा बांधायचा झाला तर हा प्रकार अगदी उत्तम. आधी केस मोकळे सोडून पोनीटेल बांधून घ्या त्या नंतर त्याला अंबाड्यासारखा (बन) बांधा आणि बाहेरच्या दिशेने खेचा.

२. मेसी बन –

आजकालच्या महिलांच्या जीवनशैलीत हा अंबाडा खूप प्रसिद्ध आहे. तुमचे केस थोडे विंचरून घ्या आणि हेअरबँड लावून अंबाड्यासारखे बांधून घ्या. 

३. द मेगा व्हॉल्यूम डबल पोनी-

तुमचे अर्धे केस पोनीटेलने बांधून घ्या. त्या नंतर खाली मोकळे सोडलेले केस पण पोनीटेलमध्ये बांधा. दोन्ही पोनीटेल वर खाली झाले की कंगवा घेऊन त्या केसांना हलकेसे विंचरा. 

४. लट पिळून पिन लावणे (ट्विस्ट अॅण्ड पिन) –

तुमचे केस मोकळे सोडा. एका बाजूची लट पिळून घ्या आणि कानाच्या वर पिन लावून केस अडकवा. ह्यात काही जास्त कष्ट लागत नाही आणि तुम्ही सुंदर दिसता.

५. घनदाट केसांची अर्धी वेणी (द ग्रोन अप हाफ हाफ) –

तुमचे अर्धे केस मागून वरच्या दिशेने पकडून त्याची अर्धी वेणी बांधा. खालच्या बाजूचे केस मोकळेच सोडा.

६. फ्रेंच ट्विस्ट पोनी-

एक उंच पोनी बांधा आणि केसांना मागून ट्विस्ट करा की झाली फ्रेंच ट्विस्ट पोनी.

७. नॉटेड लो बन-

एक घट्ट वेणी बांधून घ्या आणि ती वेणी अंबाड्यासारखी गुंडाळून मानेजवळ बांधा.

८. कुल गर्ल ट्विस्ट-

केस मोकळे सोडून केसांची लट पिळून घ्या व तिला कपाळाच्या वर बांधून घ्या.

९.  हेअरबँड टक-

अर्धे केस पोनीटेल मध्ये बांधलेत की हेअरबँड कपाळावर लावून त्यात पोनीटेलही अडकवा.

१०. हेअर हेडबँड-

पुढचे केस दोन बाजूमध्ये पसरून मध्ये एक भांग पाडा. त्या नंतर मागचे केस वर खेचून एक अंबाडा बांधा. 

 

 

Input your search keywords and press Enter.