Now Reading:
शुभ्र व स्वच्छ दातांसाठी ६ टिप्स
शुभ्र व स्वच्छ दातांसाठी ६ टिप्स

“माणसाचे हास्य हा माणसाचा सर्वश्रेष्ठ दागिना आहे.”

आणि हे हास्य असेच झळाळत ठेवण्यासाठी घेऊन आलोय सहा घरगुती नुस्खे. वाचा, ट्राय करा आणि स्माईल करा!

१. ग्रीन टी-

जपानमधील एका संशोधक अहवालानुसार ज्या व्यक्ती नियमितपणे ग्रीन टी पितात त्यांचे दात जास्त शुभ्र असतात. तसेच इजिप्तमधील संशोधनानुसार जे लोक ग्रीन टीने चूळ भरतात त्यांच्या तोंडात जंतूंचे व अॅसिडचे प्रमाण कमी असते.

२. पुदिन्याचा चहा-

पुदिन्यात नैसर्गिक सुष्मजीव प्रतिबंधक गुणधर्म असतात. तसेच, मुखवास म्हणून सुद्धा पुदिना गुणकारी आहे. त्यामुळेच बहुतेक टूथपेस्टमध्ये पुदिना असतो.

३. स्ट्रॉबेरी-

स्ट्रॉबेरीमधील मॅलीक अॅसिड नैसर्गिक तुरटीचं काम करतं ज्यामुळे दातांचे रंग सुरक्षित राहतात. जर तुमचे दात पिवळे पडत असतील तर स्ट्रॉबेरी खायला लगेच सुरुवात करा. 

४. बिया व काजू-

बिया व काजू गरांचे खडबडीत पृष्ठभाग दातांवरील डाग दूर करायला मदत करतात. मूठभर काजू गर व स्ट्रॉबेरी खायला पण मजा येईल.

५. हळदीने ब्रश करा-

नाही! मला वेड नाही लागलंय! पण बरेच तज्ज्ञ असं म्हणतात की थोडी हळद घेऊन नेहमीसारखंच ब्रश करा, मग ३-५ मिनिटांनी तुमच्या नेहमीच्या पेस्टने ब्रश करा. आठवड्याभरात तुम्हाला फरक दिसून येईल.

६. खोबरेल तेल-

खोबरेल तेलाने २ मिनिटे चूळ भरल्याने तोंडातील जंतू दूर होतात. तसेच खोबरेल तेल कॅव्हिटीवर हिरड्यांच्या आजारांवर गुणकारी असते.

 

Input your search keywords and press Enter.