Now Reading:
जेवणात मीठ जास्त झालं? काळजी करू नका, हे वाचा
जेवणात मीठ जास्त झालं? काळजी करू नका, हे वाचा

जेवणात जर मीठ नसेल तर त्याची पूर्ण चव निघून जाते. जेवणात जराजरी मीठ कमी जास्त झालं की घरचे लगेच नावं ठेवतात. कधी कधी स्वयंपाक करताना भाजी किंवा डाळीमध्ये मीठ जास्त पडते आणि तुम्ही गडबडून जाता. तो पदार्थ आता वाया गेला असं तुम्हाला वाटतं. पण आता यापुढे नो टेन्शन, कारण तुमच्या मदतीसाठी आम्ही आहोत ना. तुमचा बिघडलेला पदार्थ पुन्हा सुधारण्याच्या काही साध्या सोप्या युकत्त्या खालील दिल्या आहेत.

१. बटाटा

जर कधी भाजीमध्ये मीठ जास्त पडलं तर त्यात बटाटा टाकून तुम्ही त्याचा खारटपणा कमी करू शकता. एक बटाटा सोलून तो थोडा वेळ भाजीत टाकल्याने अधिक मीठ बटाटा शोषून घेतो.

२. गव्हाचे पीठ

गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करून मीठ जास्त झालेल्या भाजीत टाका. भाजीचा खारटपणा कमी होईल.

३. दही

खारटपणा कमी करण्यासाठी दही हासुद्धा उत्तम पर्याय आहे.

४. लिंबूचा रस

डाळीत मीठ जास्त पडल्यास त्यात लिंबाचा रस पिळावा त्याने डाळीला वेगळी चव येते आणि खारटपणा पण कमी होतो.

५. ब्रेड

भाजीत ब्रेडचे एक दोन तुकडे टाकून सुद्धा भाजीतला खारटपणा कमी होतो. ब्रेडचे तुकडे थोडावेळ भाजीत ठेऊन मग काढून टाकावे.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.