Now Reading:
पालक झाल्यावरही टिकवून ठेवा नात्यातील रोमान्स; जोडीदारासाठी करा या ७ छोट्या गोष्टी
पालक झाल्यावरही टिकवून ठेवा नात्यातील रोमान्स; जोडीदारासाठी करा या ७ छोट्या गोष्टी

एकदा का घरात पाळणा हलला की जोडपं, जोडपं राहत नाही. यातून नवरा बायकोच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. दोघांतील रोमान्स चिरतरुण ठेवण्यासाठी खालील गोष्टी आवर्जून आचरणात आणा-

 

डेट नाईट-

पालकत्वाच्या जबाबदारीत आपण इतके गुंततो की आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवायचंच राहून जातं. म्हणून महिन्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवा.

 

संवाद साधा (Communicate)-

बऱ्याचदा पालक झाल्यावर सगळी चर्चा फक्त तुमच्या बाळाबद्दल होते. म्हणून वेळोवेळी आपल्या अपेक्षा, स्वप्न व इतर समस्यांबद्दल बोलण्यासाठी किमान १० मिनिटांचा वेळ काढा.

 

दिवसभर संपर्कात राहा-

याचा अर्थ हा नाही की तासातासाला फोन करावा. पण लंच टाईमला किंवा चहाच्या ब्रेकमध्ये एखादा मेसेजसुद्धा समोरच्यावर प्रेम व्यक्त करायला पुरेसा होतो .

 

एकमेकांची काळजी घ्या-

बाळाची उठबस करण्यात दिवसअखेर वैताग येतो. म्हणून एकमेकांच्या जबाबदाऱ्या वाटून घ्या, तुमच्या जोडीदारासाठी चहा-कॉफी करा. या छोट्या वाटणाऱया गोष्टींतूनही प्रेम व्यक्त होतं.

 

एकमेकांना मोकळीक द्या-

नात्यांमध्येही अशी वेळ येते जेव्हा आपल्याला मोकळा श्वास हवा असतो. म्हणून एकमेकांना आपले छंद जोपासायची मोकळीक द्या.

 

एकमेकांचे चांगले गुण पाहा-

कोणीच परिपूर्ण नसतो, आपला जोडीदारही नाहीये याचे भान ठेवा. नेहमी त्यांच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन द्या, त्यांचं कौतुक करा.

 

विचारांत ताळमेळ ठेवा-

एक पालक, कुटुंब व टिम म्हणून तुमच्यात ताळमेळ आहे याची खात्री पटवून देण्यासाठी तुम्हाला विचार उघडपणे मांडायला हवे. जेणेकरून, घरातील तसेच घराबाहेरील निर्णय घेताना तंटे व तणाव कमी होतात. तसेच, एकमेकांबद्दल आदरभाव कायम राहतो.

Input your search keywords and press Enter.