Now Reading:
रेसिपी : गोड्या मसाल्याची झणझणीत मराठमोळी ‘कटाची आमटी’
रेसिपी : गोड्या मसाल्याची झणझणीत मराठमोळी ‘कटाची आमटी’

कटाची आमटी एक मराठी पाककृती आहे जी सहसा होळी, दिवाळी आदी सणांच्या दिवशी पुरणपोळीसोबत केली जाते.

साहित्य-

 • १ कप चणा डाळ
 • २ टेबलस्पून तूप
 • १ टीस्पून लाल तिखट
 • २ तमालपत्र
 • १ दालचिनी
 • २ लवंग
 • १ टीस्पून गोडा मसाला
 • १ टीस्पून धणेपूड
 • ५-६ कडीपत्त्याची पाने
 • चिमूटभर हिंग
 • १/२ चमचा राई
 • १/२ चमचा जिरं
 • १/४ टीस्पून हळद
 • ४ टेबलस्पून चिंचेचा कूट
 • १ टेबलस्पून गूळ
 • २ टेबलस्पून खवलेला नारळ

कृती-

१. चणा डाळ धुऊन ४ तासासाठी भिजत ठेवा आणि मग कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.

goda masala katachi amti

२. त्यानंतर डाळीतलं पाणी एका पॅनमध्ये गाळून घ्या.

३. त्या पाण्यात लाल तिखट, धणेपूड, गोडा मसाला, तमालपत्र, दालचिनी, लवंग घालून नीट ढवळून घ्या.

४. हे मिश्रण एका भांड्यात घेऊन मध्यम आचेवर उकळून घ्या.

५. पॅनमध्ये खोबरं घ्या व सोनेरी होईपर्यंत भाजा.

६. हे भाजलेलं खोबरं उकळलेल्या डाळीत घाला.

७. चिंचेचा कूट व गूळ घाला.

goda masala katachi amti

८. १५ ते २० मिनिटांसाठी डाळ उकळू द्या.

९. डाळ उकळल्यावर फोडणीसाठी पॅनमध्ये तेल व तूप गरम करा.

१०. त्यात राई-जिरं, हिंग, हळद व कडीपत्ता तडतडू द्या.

११. ही फोडणी आमटीवर टाका.

१२. कोथिंबिरीने सजावट करा व गरमागरम पुरणपोळीसोबत खायला घाला.

टीप-

ताजा कुटलेला मसाला वापरल्याने आमटीला अप्रतिम चव येते. थोडी मेहनत पडली तरी ताजा मसाला वापरल्याने चवीत खूपच फरक पडतो. जर हा मसाला वापरायचा नसेल तर १ ऐवजी २ टिस्पून गोडा मसाला वापरावा.

सविस्तर कृती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ पाहा. घरच्यांना करून घाला झणझणीत कटाची आमटी.

Input your search keywords and press Enter.