Now Reading:
तुमच्या मुलीचे शिक्षण तिच्या लग्ना इतकेच महत्त्वपूर्ण
तुमच्या मुलीचे शिक्षण तिच्या लग्ना इतकेच महत्त्वपूर्ण

सध्या लग्नाचे वारे सुरु आहेत आणि जिकडे तिकडे बघा मेहंदी, हळदीचे कार्यक्रम पाहायला मिळतात. लांबून पाहिलं तर जल्लोष, उत्साह, आनंद दिसून येतो पण जवळून पाहिलं तर एवढाच आनंद दिसून येईल का?

लग्न कार्यक्रमाला मुलीच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर आपल्याला हाच आनंद, हाच उत्साह दिसतो का? जर हो तर उत्तम पण, जर नाही तर काही तरी बदल घडवण्याची गरज आहे. 

तिला घेऊ द्या तिच्या स्वप्नांची उडाण-

कोणत्याही मुलीचे लग्न हे तिच्या इच्छेने झाले पहिले, जोर जबरदस्तीने नाही. तिच्या शिक्षणाला महत्त्वाचे स्थान देऊन तिच्या आयुष्यात बदल घडवण्याचा पर्याय दिला पाहिजे. नुसतेच मोजके शिक्षण देऊन तिला समाधान मिळवून देऊ नये. तिला स्वप्न पाहू द्या आणि ती स्वप्नं पूर्ण करण्याची हिम्मत तिच्यात निर्माण होऊ द्या. शिक्षणातून तिला तिची स्वप्नं जोपासण्यात मदत होईल. 

महाराष्ट्रात पूर्वी पासून महिलांना कमी लेखलं जातं पण सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान कार्यकर्त्यांमुळे आज महिला शिक्षण प्राप्त करू शकतात आणि समाजात उंच मानेने वावरू शकतात. 

Input your search keywords and press Enter.