Now Reading:
गांधारीला १०१ मुलांची प्राप्ती होणे यात कितपत तथ्य?
गांधारीला १०१ मुलांची प्राप्ती होणे यात कितपत तथ्य?

महाभारतात पांडवांसमोर उभे ठाकलेले १०० कौरव यांनी आई गांधारीच्या पोटून जन्म घेतला असा समज आहे. पण खरंच गांधारीला १०० पुत्रांची प्राप्ती झाली का?

सर्वसाधारण मुलीला १०१ मुलं होणे शक्य आहे का?

रशियातील फेडोर वसिलेव या व्यक्तीला १७२५ ते १७६५ दरम्यान त्याच्या बायकोकडून ६९ पुत्रांची प्राप्ती झाली होती. ज्यात १६ जुळे, ७ तिळे, व ४ चौगुणे (एकावेळी चार मुले) होते. नंतर त्यांना दुसऱ्या बायकोकडून सुद्धा १८ मुलं झाली. एकप्रकारे गांधारीच्या जवळपास जाण्यास त्यांना थोडं यश आलं असं म्हणण्यास हरकत नाही.

गांधारीला १०० भाऊ होते का?  

राजा गांधार, सुवला यांना शकुनी, सौवाला, अचला, वृषाक आणि व्रिहदवाला ही ५ मुले होती. उरलेले ९६ हे शकुनीचे भाऊ किंवा चुलत भाऊ असू शकतील. महाभारतात एखाद्याचा नातलग हा भाऊ समजला जात असे. म्हणून कदाचित युद्धात लढताना ते सगळे एकमेकांचे बंधू म्हणून कुरुक्षेत्रात उतरले. गंधारचा राजा नग्नजित हा सुद्धा शकुनी आणि गांधारी यांचा भाऊ असण्याची शक्यता वर्तविली जाते.

दुसरा एक समज

कुंती गांधारीच्या आधी आई झाली याबद्दल गांधारीला ईर्ष्या होत होती. कारण गांधारीला कुंतीच्या आधी गर्भधारणा झालेली आणि असं म्हटलं जातं की, गांधारी तब्बल २ वर्षे गर्भ धारण करून होती. या गोष्टीला वैतागून गांधारीने तिच्या दासीला लोखंडी सळईने गर्भावर मारायला सांगितले. जेणेकरून बाळ बाहेर येईल. पण बाळाऐवजी मांसाचा एक गोळा बाहेर पडला.

गांधारीला अतीव दुःख झालं. तेवढ्यात तिला आठवण झाली की, महर्षी व्यासांनी तिला शंभर पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला होता. म्हणून ती त्यांच्याकडे गेली. तेव्हा व्यासांनी त्या मांसाच्या गोळ्याचे १०१ तुकडे केले व दह्यामध्ये ठेवले. ज्यातून १०० पुत्र व एका पुत्रीची प्राप्ती गांधारीला झाली.

व्यासांची कल्पना

काहींच्या मते ही केवळ महर्षी व्यासांची कल्पना असू शकते कारण शेवटी तेच महाभारत या महाकाव्याचे रचेते आहेत.

Input your search keywords and press Enter.