Now Reading:
या देशात समोस्यावर बंदी! तुमचा विश्वास नाही बसणार पण असे आणखीही बरेच पदार्थ
या देशात समोस्यावर बंदी! तुमचा विश्वास नाही बसणार पण असे आणखीही बरेच पदार्थ

खाद्यपदार्थांच्या बंदीवरून चाललेला गदारोळ भारताला काही अपरिचित नाही. पण परदेशात काही असे चमत्कारिक कायदे आहेत ज्यांना पाहून तुम्ही संभ्रमात पडाल की यांचे पाय धरायचे की गळा. मी काय बरळतोय कळत नाहीए? वाचा तर मग.

१. समोसा

सोमालिया या देशामध्ये समोस्यावर बंदी आहे. येथील अल-शबाब या पक्षाच्या नेत्यांना समोसे आक्षेपार्ह वाटतात. त्यांच्या मते समोस्याचा त्रिकोणी आकार पवित्र ख्रिश्चन ट्रिनिटी सारखा दिसतो आणि हे इस्लाम धर्माच्या शिकवणींच्या अनुरुप नाही. आता काय म्हणावं याला?

२. केचअप

समोस्याबरोबर काय चांगलं लागतं? चटणी की केचअप? जाऊ द्या हा वाद इतर दिवशी सोडवू. इथे मुद्दा आहे, केचअपच्या बंदीचा. फ्रांसमध्ये प्राथमिक विद्यालयांत केचअपवर बंदी आहे. याचं कारणही इतकं अंधाधुंद आहे की काय सांगू. तुम्हाला वाटेल की मुलांना हानिकारक वगैरे असेल म्हणून सरकारने बंदी आणली असेल. तर नाही! तर केचअपमुळे फ्रांसच्या पारंपारिक पाकशैलीला धोका आहे. केचअपच्या चवीमुळे मुळ फ्रेंच स्वाद झाकला जातो.

३. किंडर

अमेरिकेत किंडरवर बंदी आहे. किंडरच्या आतलं प्लास्टिकचं खेळणं लहान मुलांनी गिळू नये म्हणून अमेरिकेतील स्थानिक सरकारने किंडरवरच बंदी घातली.

४. च्युविंग गम

सिंगापूर आपल्या स्वच्छतेसाठी जगप्रसिद्ध आहे हे तर सर्वश्रुत आहे. त्यांच्या स्वच्छतेबाबतीच्या काटेकोर नियमांचे उदाहरण म्हणजे तिथे च्युविंग गम खाऊन रस्त्यावर टाकल्यास ५०० डॉलरचा (३२००० रुपये) दंड आहे. २००४ पासून सिंगापूरने कायदा अंमलात आणला.

५. जेली

युनायटेड किंग्डममध्ये जेली खाण्यावर बंदी आहे. जेलीमध्ये कोंजॅक नावाचा घटक असतो जो आरोग्यास हानिकारक असतो. तो नसल्यास जेली विकली तर चालतो.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.