Now Reading:
भारतातील अशी ५ ठिकाणं जिथे पूजलं जातं मृत्यूचं दैवत
भारतातील अशी ५ ठिकाणं जिथे पूजलं जातं मृत्यूचं दैवत

हिंदू मान्यतेनुसार यमाला ‘मृत्यू देवता’ म्हणून ओळखले जाते. हिंदू देवीदेवतांमध्ये दंडनायक म्हणून शनी, यम आणि भैरव यांना मानले जाते. भारतामध्ये शनी व भैरव या देवतांचे देऊळ प्रसिद्ध आहे. पण यम हा कधीच देवतांच्या यादीत मोडला गेला नाही. पण भारतात ५ अशी ठिकाणे आहेत जिथे यमराजाचे देऊळ आहे. आश्चर्य वाटल ना? स्वतःच पाहा तर..

भरमौरचे यम मंदिर

यमराजाचे हे मंदिर हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात स्थित आहे. घराच्या आकाराप्रमाणे दिसणाऱ्या या मंदिराबद्दल अनेक मान्यता प्रसिध्द आहेत. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याची आत्मा प्रथम या मंदिरात येते असा लोकांचा समज आहे. या मंदिराच्या आत प्रवेश करण्याचे धाडस आजपर्यंत कोणीही केले नाही.   

यमुना-धर्मराज मंदिर विश्राम घाट

मथुरा- उत्तर प्रदेशातील यमुनेच्या काठावर विश्राम घाटाजवळ हे मंदिर स्थित आहे. यमुना आणि यम हे सुर्याचे अपत्य समजले जाते त्यामुळे या मंदिराला भाऊ- बहिणीचे मंदिर असं देखील म्हणतात.

धर्मराज मंदिर लक्ष्मणझुला-

हृषिकेश येथील यमराजाचे हे सर्वात प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये चित्रगुप्त आणि यम या दोघांच्या मुर्ती आहेत.

वाराणसीचे धर्मराज मंदिर–

वाराणसीतील मीर घाटावर हे मंदिर आहे. हे पूर्वी महादेवाचे मंदिर होते. येथे अशी मान्यता आहे की, या ठिकाणीच यमाने महादेवाची आराधना करून ‘यमराज’ ही उपाधी मिळवली.

श्रीचित्रगुप्त आणि यमराज मंदिर कोइम्बतूर-

तामिळनाडूच्या कोइम्बतूर शहरातील वेल्लालूर मुख्य रस्त्यावर सिंगानल्लुरमध्ये हे मंदिर वसले आहे. येथे चित्रगुप्त आणि यमराज यांच्या मुर्ती आहेत.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.