Now Reading:
६ कारणं जी तुम्हाला आर्थिकरित्या स्वावलंबी होण्यास प्रवृत्त करतील
६ कारणं जी तुम्हाला आर्थिकरित्या स्वावलंबी होण्यास प्रवृत्त करतील

आजच्या जगात महिला उच्चपदावर आपली कामगिरी बजावत आहेत. काळाबरोबर चालणाऱ्या ह्या स्त्रियांनी आर्थिक स्वातंत्र्य पण जोपासले आहे ज्यामुळे त्या समाजात ताठ मानेने जगू शकतात. प्रत्येक मुलीवर बालपणापासून हे संस्कार झाले पाहिजेत ही आजच्या काळाची गरज आहे.

१. कधी ही काहीही होण्याची शक्यता असते हे प्रत्येकाने गृहीत धरूनच चालले पाहिजे. घर असो किंवा कामाचं  ठिकाण कोणत्याही स्त्रीने घाबरून न जाता वेळ निभावून कर्त्यव्य पूर्ण करण्याची क्षमता स्वतःत बाळगली पाहिजे. जर ती आर्थिकरित्या स्थिर असेल तर कोणत्याही वेळेला सामोरं जायची क्षमता तिच्यात निर्माण होते. 

२. रोजच्या जगण्याचा खर्च स्वतःहून पूर्ण करता आला तर स्वतःलाच एक मनःशांती आणि विश्वास येतो.

domestic violence

३.आई बाबा किंवा नवऱ्यावर अवलंबून न राहता जेव्हा स्वतंत्र जगण्याचा एक विश्वास मनात भरतो तेव्हा तुम्हाला उंच भरारी घेण्यावाचून कोणीच थांबवू शकत नाही. 

४. कौटुंबिक हिंसेचे किस्से ऐकले तर राग येतो ना? मग कोणत्याही स्त्रीने हे सहन करू नये आणि कोणावर असा अन्याय होत असेल तर त्याच्या मदतीस धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे. स्वतःची व दुसऱ्यांची सहायता करायच्या हेतूने स्वतंत्र व्हा. 

५. तुम्ही जर तुमच्या कर्तव्यात ठाम असाल तर दुसऱ्या महिलांना देखील प्रेरित करू शकाल. तुम्हाला बघून त्यांच्या मनात देखील ऊर्जा निर्माण होईल, ज्याने त्यांना एक स्वतंत्र स्त्री होण्याची आशा मिळेल.

६. देशाच्या विकासासाठी पुरुष आणि स्त्री दोघांनी एकत्र पुढे वाटचाल केली पाहिजे. एकमेकांवर अवलंबून न राहता एकमेकांना बळ दिले पाहिजे, जेणेकरून देशातील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. 

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.