Now Reading:
दर महिन्याला खर्चाचे पैसे वाचवण्यासाठी गृहिणींसाठी ९ टिप्स
दर महिन्याला खर्चाचे पैसे वाचवण्यासाठी गृहिणींसाठी ९ टिप्स

प्रत्येक बाबतीत काटकसर करण्याची सगळ्याच गृहिणींची सवय असते. शेवटी वर्षानुवर्षे घरचा खर्च त्या चालवतायत. पण तरीही काही आधुनिक टिप्स आहेत ज्या तुम्हाला आणखी सुसंगतपणे बचत करण्यास मदत करतील

१. सोपी सुरुवात-

बऱ्याच आई मानतात की बचतीची सुरुवात साधी असावी. उदा. स्वस्त वॉशिंग पावडर, पर्यायी तेल इत्यादी स्वरूपाची.

२. जोडीदाराला सोबत घ्या-

एक से भले दो! तुमच्या या संकल्पामध्ये तुमच्या जोडीदाराला सोबत घ्या. जेणेकरून दोघांनी मिळून निर्णय घेताना भविष्यात विनाकारण तिढे उद्भवणार नाही.

३. खोट्या अपेक्षा बाळगू नका-

तुम्ही म्हणाल वर्षाला हजारो रुपये वाचवू. पण, जाणकार गृहिणी हे नक्कीच जाणतात की बचत केल्यावर त्याचे प्रमाण अवाढव्य नसले तरी मुबलक प्रमाणात पैसे नक्कीच वाचणार.

४. डिस्काउंट कुपन-

शॉपिंग पॉईंट्स, गिफ्ट कार्ड्स, डिस्काउंट व्हाउचर्सचा पुरेपूर फायदा घ्या. पण याचा अर्थ असा नाही की विनाकारण खरेदी करा.

५. समाधानी राहा-

जेव्हा तुम्ही आपल्याकडील वस्तुंबद्दल समाधानी राहाल तेव्हा तुम्ही जास्त सक्षम होता. कारण बाजारात नेहमीच वरचढ गोष्टी येत राहणार पण त्यांची तुम्हाला खरोखर गरज आहे का हे पाहा. 

६. खर्चाचे मूल्यमापन-

तुमची बिलं, हफ्ते, भाडी, रेशन यांसाठी पहिले पैसे बाजूला काढून ठेवा. त्यानंतर इतर खर्चाचा विचार करा

७. काटकसर सगळ्यांसाठीच नसते-

काहीवेळा थोडी महागडी पण टिकाऊ वस्तू घेणे कधीही चांगले कारण त्याने नंतर येणारे अवाजवी खर्च टाळता येतात.

८. इंटरनेट-

इंटरनेटवर प्रत्येक गोष्ट मिळते आणि प्रत्येक गोष्टीसाठी बेस्ट ऑफर उपलब्ध असते. बाजारात जाण्यापूर्वी एकदा इंटरनेट वर किंमत पडताळून पहिली तर बरेच पैसे वाचवता येतात.

९. मैत्रिणींशी चर्चा-

तुमच्या खर्चाचे प्लॅनिंग, शॉपिंगबद्दल मैत्रिणींशी चर्चा करा कदाचित त्यांना आणखी चांगली ऑफर ठाऊक असेल.

Input your search keywords and press Enter.