Now Reading:
तुमच्या मुलांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ७ सोपे धडे
तुमच्या मुलांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ७ सोपे धडे

लहान मुलं म्हटली कि हट्ट तर करणारच! पण त्यांच्या हट्टाला सकारात्मक वळण कसे देता येईल याच्या विचारात जर तुम्ही अडकला आहात तर तुमच्यासाठी घेऊन आलोय काही सोप्या टिप्स. त्याचसोबत तुम्ही तुमच्या मुलांना आर्थिकदृष्ट्या तयारही करू शकता.

 

१. कुटुंबाच्या खरेदी व बिलांबद्दल तुमच्या पाल्याशी गप्पा साधा-

जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा तुमच्या पाल्याशी खरेदी, जमाखर्च याबद्दल चर्चा करा. बिलं-चेक भरताना तुमच्या पाल्याला सोबत न्या.

 

२. धोकादायक आणि सुरक्षित गुंतवणूक यामधला फरक-

तुमच्या पाल्याला शेअर्स, गंतवणूक, विमा आणि जुगार, लॉटरी यातील फरक समजावून सांगा. यामधून होणारे फायदे तोटे यांबद्दल उदाहरणे द्या. 

 

३. सेव्हिंग अकाउंट उघडा-

त्यांच्यासाठी बँकेत बचत खातं उघडा. तसेच त्या खात्याचे व्यवहार त्यांना हाताळू द्या.

 

४. एक ध्येय तयार करा-

अशी कोणती गोष्ट आहे का जी तुमच्या पाल्याला खूप आवडते? तर ती गोष्ट त्याचं ध्येय बनवा व ती मिळवण्यासाठी त्यांनी कशी बचत केली पाहिजे हे समजावून सांगा. जेणेकरून, ठराविक काळात त्यांना ती खरेदी करता येईल याचं त्यांना मार्गदर्शन करा.

 

५. कुटुंबाच्या प्लॅनिंगमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या-

कुटुंबाच्या बजेट प्लॅनिंगमध्ये त्यांना मत मांडू द्या. बचत करण्यासाठी त्यांना काही सुचतंय का हे विचारा.

 

६. असे खेळ खेळा ज्यात व्यवहार शिकता येतो-

व्यवहार अगदीच गंभीर असायला हवा असं नाही. खेळातूनही शिकण्यासाठी नवा व्यापार, मोनोपॉली सारखे मजेदार पर्याय आहेत. त्यांनंतर आता ऑनलाइन बरेच गेम्स आहेत ज्यातून व्यवहाराबद्दल शिकता येऊ शकतं.

 

७. चुकीला माफी आहे-

तुमच्या मुलांना चुका करायचं स्वातंत्र्य द्या. चूक घडलीय तर संवादही घडायला हवा. जेणेकरून ते भविष्यात महत्त्वाच्या व्यवहारात अशा चुका होणार नाहीत.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.