Now Reading:
विद्येच्या देवतेकडून शिका ५ गुंतवणूकीचे धडे, सुख येईल तुमच्या दारी
विद्येच्या देवतेकडून शिका ५ गुंतवणूकीचे धडे, सुख येईल तुमच्या दारी

बाप्पा म्हणजे विद्येचे दैवत, बाप्पा म्हणजे संकटमोचन, बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता! नुसत्या ९ ते ५ च्या नोकरीच्या पगारावर कोणाचंच काहीच भागत नाही. पैसा गुंतवला नाही तर पैसा वाढणार नाही. गुंतवणुकीच्या गुंत्यातून सुरळीत बाहेर पडायचं असेल तर बाप्पाकडे आहेत तुमच्यासाठी हे चतुरंगी सल्ले.

१. नम्रता-

गणपतीचे वाहन म्हणजे उंदीर मामा. पण कधी विचार केलाय का, की महाकाय हत्तीचे तोंड असलेल्या या गणराजाने इवलुश्या उंदरावरून का प्रवास करावा? यातून गणपतीची साधी राहणी उच्च विचारसरणी दिसून येते.

म्हणून आपण पैशाची जास्तीत जास्त बचत करून पैशाची उधळपट्टी कमी करावी.

२. बुद्धीचातुर्य-

finance lessons ganesha

हत्तीचे तोंड हे बुद्धी व ज्ञानाचे प्रतीक आहे. तसेच हत्ती हा दूरदर्शी प्राणी आहे. आर्थिक गुंतवणूक करतानासुद्धा भविष्याचा विचार करणे तसेच गुंतवत असलेल्या योजनेतील फायदा तोट्यांबद्दल संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात नुकसान होणार नाही.

३. अनुकूलन क्षमता-

गणेशाचे पोट हे त्याच्या सर्वसमावेशक वृत्तीचे प्रतीक आहे. यातून त्याची प्रत्येक परिस्थिती स्वीकारून त्यानुरूप वागायची प्रवृत्ती दिसून येते. म्हणूनच आपल्या गुंतवणुकीवर कायम एक नजर ठेवावी आणि जी गुंतवणूक फायदा देत नाहीये ती बंद करून जिथे नफा होत आहे अशा ठिकाणी नव्याने गुंतवणूक करावी. 

४. सहनशक्ती-

गणपती म्हणजे विघ्नहर्ता. संकट दूर करणारा. त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा ठरवावे की तुम्हाला नेमकं काय हवंय. कितीही संकटे आली तरी त्यांना अंगावर झेलून त्यांचे चातुर्याने निवारण करावे याचा कधीच विसर पडू देऊ नये.

Input your search keywords and press Enter.