Now Reading:
व्यायाम व पोषक आहारातून करा ६ प्रकारच्या कर्करोगांवर मात
व्यायाम व पोषक आहारातून करा ६ प्रकारच्या कर्करोगांवर मात

कर्करोगाची लागण होणे मानसिक व शारीरिकरीत्या प्रचंड त्रासदायक असू शकते. बऱ्याचदा यामागचं कारण असं हि असतं की लोकांमध्ये चुकीचा समाज असतो कि, कर्करोग/कँसर वर इलाज करता येत नाही. पण असं नाहीये, कर्करोगाचे बरेच प्रकार असतात त्यातील बरेचसे प्रकार हे नियमित उपचाराने बरे होतात.

कर्करोगावर मात करताना सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे व्यायाम! नियमित व्यायाम व पोषक आहार. खालील कर्करोगांच्या प्रकारांवर व्यायाम व सकस आहारामुळे प्रतिबंध करता येतो.

१. आतड्यांचा कर्करोग-

अमेरिकेतील संशोधनात असं आढळून आलंय कि, नियमित व्यायाम व सकस आहाराने आतड्यांचा कर्करोग होण्याचे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी होते.

२. प्रोस्टेट कर्करोग-

प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये आढळून येतो. आणि संशोधकांना असे आढळून आलेय की जे पुरुष नियमित व्यायाम करता त्यांना कर्करोग होण्याचे प्रमाण फार कमी आहे.

३. स्तन कर्करोग-

दररोज २० मिनिटांची कसरत करून महिला स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी करू शकतात. कसरतीमुळे महिलांच्या शरीरातील हॉर्मोन व प्रथिनांमध्ये सुद्धा बदल दिसून येतो. 

४. फुप्फुसाचा कर्करोग-

तुम्हाला माहित आहे का? धुम्रपानामुळे होणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण नियमित व्यायामाने कमी होऊ शकते. पण लक्षात असू द्या कि यातून तुमचा धोका पूर्णपणे टळत नाही फक्त तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.

५. गर्भाशयाचा कर्करोग-

ज्या स्त्रिया नियमित व्यायाम करतात त्यांच्यामध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी असते. 

६. जठराचा कर्करोग-

जगभरातील बऱ्याच कर्करोग संशोधकांना असे आढळून आले कि कसरत केल्याने जठराचा कर्करोग टाळता येतो.

Input your search keywords and press Enter.