Now Reading:
तुमच्या टांग देणाऱ्या मित्राची दर वीकेंड ट्रिपला ठरलेली ७ कारणे
तुमच्या टांग देणाऱ्या मित्राची दर वीकेंड ट्रिपला ठरलेली ७ कारणे

एखाद्या ट्रिपला जाण्यापेक्षा जास्त मजा तर प्लॅन करताना असते. कारण प्रत्येक ग्रुपमध्ये तो एक महाभाग असतोच असतो जो ऐन वेळेला टांग देतो. तरीही मुद्दा हा नसतोच कधी, की त्याने टांग दिलीय उलट मजा तर त्यांच्या बहाण्यात असते. म्हणजे आपल्याला माहित असतं की हा टांग देणार आहे पण त्याच्या तोंडून ऐकण्याची मजाच काही वेगळी असते. बघुया तर तुमचा मित्र कोणत्या प्रकारात बसतो ते-

१. विसरूनच गेलो रे

आठवडाभर ग्रुपवर शांत बसलेला हा मित्र नेमका वीकेंडला असा काही आव आणेल जणू काही आम्ही त्या गावचे नाहीच. अचानक त्याच्या अंगात गजनीचा आमिर खान काय येणार नि तो सगळं विसरून काय जाणार.

२. मदर इंडियाचा पत्ता खेळणारा

हा मित्र आईला साधी दळणाची पिशवी आणायला मदत करणार नाही. पण पार्टीला जायचं म्हटलं की सरळ आईचं नाव पुढे करेल. ‘आईला डॉक्टरकडे न्यायचंय’ ‘आईसोबत खरेदीला जायचंय’, अशा वेळी आपण तरी काय बोलणार.

३. कसंतरीच होतंय रे

आता हे म्हणजे बर्म्युडा ट्रायंगलपेक्षाही मोठं रहस्य आहे. आता कोणाला पडलीय याच्या कसंतरीच होतंय त्याची, फक्त इथे ऑक्स केबल देऊन जा म्हणजे झालं.

४. नेटवर्क नसलेला दोस्त

तसा तर हा वर्षभर पोरींसोबत व्हिडीओ कॉलिंग करेल पण आपण फोन करणार तेव्हाच याचं नेटवर्क गळपटतं आणि मग ‘हॅलो!!! हॅलो!!! अरे काही ऐकू येत नाहीए’ म्हणत तो फोन ठेवणार.

५. घरी पाहुणे आलेत, मी बाहेर नाही येऊ शकत

तसं तर याला यांच्या फॅमिलीत शेमडं पोर पण नाही विचारत पण, मित्रांना टांग द्यायची वेळ आली की अचानक हा सुरज बर्जातियाच्या फिल्ममधील घरचा लाडला होऊन जातो.

६. जुलाब झालेत रे

या असल्या नैसर्गिक आपत्तीवर काय इलाज करणार. त्याने सांगितलं, आपण ऐकलं नि फोन ठेवला.

७. मला बिग बॉस बघायचंय

पहिली गोष्ट हे इथेच थांबवा. हा तुमचा मित्र नाही, विषय कट! (उद्यापासून याला मीम्समध्ये टॅग करणे पण बंद)

Input your search keywords and press Enter.