Now Reading:
उच्च शिक्षणासाठी कर्ज काढताना हे ५ मुद्दे लक्षात घ्या
उच्च शिक्षणासाठी कर्ज काढताना हे ५ मुद्दे लक्षात घ्या

हल्लीच्या काळात उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. पण त्यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच आर्थिक बाजूही भक्कम लागते. परदेशातील चांगल्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. त्यासाठी अनेक बँका, पतपेढी संस्था शैक्षणिक कर्जही देतात. पण शैक्षणिक कर्ज काढताना खालील गोष्टींचा विचार करणेही गरजेचे आहे.

शिक्षणासाठी कर्ज घेताना त्याचा योग्य वापर करा

उच्चशिक्षण घेताना तुमची ध्येय आणि भविष्यात असणाऱ्या त्या क्षेत्रातील नोकरीच्या संधी या गोष्टींचा विचार करा. कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेताना आधी तुमची पात्रता, त्या अभ्यासक्रमाची फी, विद्यापीठाचे महत्त्व या सर्व गोष्टींचा अभ्यास करा. त्याचप्रमाणे तुमच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करा.

संभाव्य नोकरीच्या संधी

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही कर्ज घेत असाल तर त्या क्षेत्रातील नोकरीच्या संधींचा अभ्यास करा. कारण शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करुन ते कर्ज तुम्हालाच फेडावे लागते. म्हणूनच उच्च शिक्षणासाठी कर्ज घेताना संभाव्य नोकरीचा विचार करा.

एकापेक्षा अनेक इतर कर्जयोजनांची देखील माहिती घ्या

कर्ज घेताना फक्त एकाच कर्जदात्यावर अवलंबून राहू नका. इतर बँकांच्या कर्ज योजनांचा आढावा घ्या आणि त्यांचा नीट अभ्यास करा. कर्जाचे हफ्ते, व्याज, परतफेडीचा काळ इत्यादी गोष्टी पारखून घेऊन सोयिस्कररित्या कर्ज काढा.

शिक्षणावरील कर्जातून मिळणाऱ्या कर सवलतींचा लाभ घ्या

८० इ विभागांतर्गत शैक्षणिक कर्जावर मिळणाऱ्या कर सवलतीचा लाभ घ्या. कर्जदाराने भरलेल्या व्याजावर त्याला कर सवलत मिळते. ही सवलत तुमचे कर्ज फेडेपर्यंत मिळत राहते. ह्या संधीचा लाभ घ्या. ही सवलत फक्त नोंदणीकृत बँकापासून कर्ज घेतल्यावरच मिळू शकते.

पूर्वयोजना तयार ठेवा

समजा शिक्षण पूर्ण झाल्यावर काही कारणांमुळे कर्ज फेडता आले नाही तर त्यासाठी पूर्वयोजना तयार ठेवा. नोकरी लवकर न मिळणे अथवा सुरु केलेल्या स्टार्टअपमध्ये यश न येणे यांसारख्या अनेक कारणांनी कर्जाचे हफ्ते अडकून राहतात. म्हणूनच तुमची पूर्वयोजना तयार ठेवा. जेणेकरुन तुम्ही कर्जाचे हफ्ते भरु शकाल.

शिक्षणासाठी कर्ज काढण्यापूर्वी वरील गोष्टींचा एकदातरी नक्की विचार करा.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.