Now Reading:
महिलांकरिता सरकार आणू पाहतंय अच्छे दिन; जाणून घ्या या सरकारी योजनांबद्दल
महिलांकरिता सरकार आणू पाहतंय अच्छे दिन; जाणून घ्या या सरकारी योजनांबद्दल

महिला व बाल विकास मंत्रालयाने आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्यासाठी बऱ्याच योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनांची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत आम्ही या लेखातून पोहचवत आहोत.

१. सपोर्ट ट्रेनिंग अॅण्ड एम्पॉवरमेंट (STEP)-

ज्या महिलाना आर्थिक मदतीतीची गरज असते त्यांच्यासाठी काम आणि रोजगार उपलब्ध करून देण्यात येतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तपासणीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक शिक्षण मिळवून देण्याचे काम सरकार करतं. 

२. राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ अडॉलेंसंट गर्ल्स (RGSEAG) – ‘SABLA’-

१६ वर्षांहून खालील मुलींसाठी ही योजना तयार करण्यात आली. मुलींच्या सर्वांगीण विकासाकरीता ही योजना काम करते.

३. नॅशनल मिशन फॉर एम्पॉवरमेंट ऑफ वूमन-

महिलांची आर्थिक उपेक्षा, त्यांचे शोषण या विरोधात आवाज उठेवणे, आरोग्य व शिक्षण या करीत वाटचाल करणे हे या योजनेचे मुख्य हेतू आहेत. 

४. राष्ट्रीय महिला कोष-

१९९३मध्ये ही योजना सुरु करण्यात आली. ज्या महिला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे असतील त्यांना मदतीचा हात देण्याचे काम ही योजना करते. महिलांना रोजगार मिळवून त्यांचे आयुष्य सुधारते.

५. हुंडा प्रतिबंध अधिनियम-

१९६१ मध्ये हुंडा घेणे व देणे भारतीय सरकारच्या कायद्यानुसार चुकीचे आहे. हुंड्याची देवाण घेवाण केल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.

Input your search keywords and press Enter.