Now Reading:
भगतसिंग, राजगुरूंना लाहोरमधून सोडवणारी वीरांगना दुर्गावती देवी उर्फ दुर्गा भाभी
भगतसिंग, राजगुरूंना लाहोरमधून सोडवणारी वीरांगना दुर्गावती देवी उर्फ दुर्गा भाभी

दुर्गा देवी वोहरा उर्फ दुर्गा भाभी यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९०७ रोजी अलाहाबादमधील एका गुजराती कुटुंबामध्ये झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा विवाह लाहोरमधील एका सुखवस्तू घराण्यातील भगवती चरण वोहरा या तरूणाशी लावून देण्यात आला. भगवती चरण तेव्हा रेल्वेमध्ये काम करत होते.

क्रांतिकार्याची तोंडओळख

कॉलेजच्या दिवसांपासूनच वोहरा सत्याग्रहात सामील झाल्या. त्यानंतर त्यांनी भगतसिंग, सुखदेव आणि यशपाल यांच्यासोबत लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये जगभरातील क्रांतिकारी चळवळींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुरु केली. तसेच, त्यांच्या मित्रांसोबत देशातील तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन सामाजिक विषमता व अन्याय मिटवण्यासाठी नौजवान भारत सभा स्थापन केली.

वोहरांच्या राहत्या घरी क्रांतिकाऱ्यांची ये-जा वाढली. यातूनच दुर्गा देवींचा या क्रांतिकाऱ्यांशी संपर्क झाला. आणि जेव्हा ही रसायनं एकत्र आली तेव्हा जगाच्या क्रांतिकारी इतिहासामध्ये एकच विस्फोट झाला.

स्वातंत्र्य लढ्यात उडी

ठाणे आणि मामलेदार मिसळ हे मिसळप्रेमींच्या आवडीचं समीकरण. मामलेदारची खासियत म्हणजे इथली सुपरतेज मिसळ.फक्त २० रुपयांत तुम्हांला ही मिसळ चाखता येईल. 

फडतरे मिसळ केंद्र, कोल्हापूर-

लाहोरच्या गर्ल्स कॉलेजमध्ये शिक्षिका असताना आपल्या सभोवतालच्या वातावरणाने पेटून उठत त्या ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन’मध्ये (HSRA) सहभागी झाल्या.

१९२० च्या दशकाच्या उत्तरार्धात असोसिएशनने आपल्या क्रांतिकारी कार्यवाया वाढवल्या. न्यायलयीन कोठडी, ब्रिटीश न्यायलयाच्या बोलावण्याचे मिठाई वाटपाने स्वागत केले जाऊ लागले. असोसिएशनच्या या कारवायांच्या आखणीमध्ये दुर्गा देवींचा मोलाचा वाटा असे. १९२८ मध्ये, असोसिएशनच्या सभासदांच्या पाठी ब्रिटीशांचा ससेमिरा लागला. म्हणून आपल्या तीन वर्षांच्या मुलासह दुर्गा देवी अज्ञातवासात गेल्या.

भगवती चरणांनी बॉम्ब बनवण्यासाठी खोली भाड्याने घेतली होती. वोहरा दाम्पत्याला कल्पना होती की, त्यांचं काम पोलिसांचे लक्ष वेधून घेत होते. तरीही त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरूच ठेवले. त्यासाठी भगवती चरण कॉंग्रेसची भेट घेण्यास कलकत्यास गेले.

सॉंडर्सची हत्या

इकडे १९ डिसेंबर १९२८ रोजी, भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनी सॉंडर्सची हत्या केली. आणि देशभरात क्रांतिचे एकच लोण उठले. ब्रिटीश संचारल्यागत या तिघांचा शोध घेऊ लागले. बेसुमार अटकी व चौकश्या होऊ लागल्या. कसंही करून लाहोर सोडायचं होतं. पण कसं? जिकडेतिकडे ब्रिटीशांचा कडेकोट बंदोबस्त होता. तिघांनी दुर्गा भाभींचं घर गाठलं.

ब्रिटीशांना तुरी देऊन पसार

दुर्गा देवी तयारीनिशीच बसलेल्या. त्यांनी आणीबाणीच्या वेळेसाठी राखून ठेवलेले सगळे पैसे त्यांच्याकडे दिले. तसेच लाहोरमधून पलायन करण्यासाठी भगतसिंगांसोबत त्यांची पत्नी असल्याचे नाटक करायला तयारही झाल्या (त्या काळच्या विचारधारेचा विचार करता ही स्वतःमध्येच एक क्रांतिकारी घटना आहे). दुर्गादेवी आपला मुलगा व भगतसिंग आणि राजगुरू (जे त्यांच्या नोकराच्या वेशात होते.) यांसोबत लाहोरच्या प्रथम दर्जाच्या डब्ब्यात जाऊन बसल्या व त्यांनी ब्रिटीशांच्या नाकावर टिचून लखनऊ गाठलं.

पार्लमेंटवरील हल्ल्याचे पडसाद

त्यानंतर जेव्हा ते कोलकत्यात जाऊन भगवती चरणांना भेटले तेव्हा त्यांना आपल्या पत्नीचा अभिमान वाटला. पण हा काळ सोहळ्याचा नव्हता. लागलीच पुढची मोहीम होती. तिथेच दिल्लीतील पार्लमेंटवरच्या हल्ल्याचा कट रचण्यात आला. आणि ८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी पार्लमेंटमध्ये बॉम्ब फेकले व स्वतःला पोलिसांच्या स्वाधिन केले. यासोबतच असोसिएशनच्या तरूण नेत्यांना अटक करण्यात आली. यादरम्यान त्या असोसिएशनच्या तुरुंगातील सभासदांच्या पोस्टमनचं काम त्या करीत व त्यांचे संदेश त्यांच्या परिवारजनांपर्यंत पोहचवत. हळूहळू असोसिएशनच्या कारवायांत व नेतृत्वात एक भलीमोठी पोकळी जाणवू लागली. आणि या लढ्याची मशाल दुर्गादेवींनी आपल्या हाती घेतली.

क्रांतिची मशाल तेवत ठेवली

त्यांनी पंजाबचे माजी गव्हर्नर लॉर्ड हेली यांच्या हत्येचा सापळा रचला. पण दुर्दैवाने ते यातून सुखरूप पळाले पण त्यांच्या सहकाऱ्यांना दुखापत झाली.

लाहोरमध्ये भगवती चरण तुरुंगावर बॉम्ब हल्ला करून भगतसिंगांची सुटका करण्याच्या बेतात होते. पण रावी नदीच्या काठी बॉम्बची चाचणी करताना बॉम्ब अचानक फुटला आणि भगवती चरण जागीच ठार झाले.


दुर्गादेवींना शोकाकुळ होण्यासाठी वेळ नव्हता. देश क्रांतीने खवळत होता. त्यांनी जुलै, १९२९ मध्ये लाहोरमध्ये भगतसिंगांच्या सुटकेसाठी त्यांचे फोटो उंचावत निदर्शने केली.

३ वर्षांचा तुरुंगवास

त्यानंतर त्याच वर्षी ८ ऑक्टोबर १९२९ रोजी, साऊथ बॉम्बेतील लॅमिंगटन रोडवर ब्रिटीश पोलीसावर गोळी झाडली. यासाठी त्यांना ३ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. इतिहासातील ही पहिलीच वेळ होती की कोणा महिला क्रांतिकारकाला सरकारतर्फे अतिरेक्याचं रुप दिलं जात होतं.

१९३९ मध्ये मद्रासमध्ये इटलीमधील अग्रगण्य शिक्षिका मारिया मॉंटेसरी यांना जाऊन भेटल्या. त्यांच्याकडून शिक्षणप्रसाराचे धडे घेऊन त्यांनी लखनऊमध्ये उत्तर भारतातील पहिली मॉंटेसरी उघडली. स्वातंत्र्योत्तर काळात त्या राजकारणापासून दूरच राहिल्या. १५ ऑक्टोबर १९९९ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी लखनऊमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

News and Image Source: The Better India

Input your search keywords and press Enter.