Now Reading:
अरेच्चा, पगार कमी करण्यासाठी हे डॉक्टर ठोठावतायत सरकारचे दार!
अरेच्चा, पगार कमी करण्यासाठी हे डॉक्टर ठोठावतायत सरकारचे दार!

कर्मचाऱ्यांचा मोर्चा म्हटला की, कामकाजाचे तास, पगारवाढ, सुट्ट्या हे असे मुद्दे ठरलेलेच असतात. पण कधी असं ऐकलंय? की एखादा जमाव पगार कमी करण्यासाठी निदर्शने करतोय. नसेल ऐकलं तर आज वाचा कॅनडामधील या डॉक्टरांची आश्चर्यचकित करणारी गोष्ट!

सरकारच्या निर्णयावर नाराजी

कॅनडामधील ‘क्युबॅक’ या राज्यातील डॉक्टरांचं तिथल्या सरकारने वेतन वाढवण्याची घोषणा केली. साहजिकच आहे पगारवाढीची घोषणा ऐकल्यावर कोणीही जल्लोष करेल. परंतु, इथे झालं नेमकं उलटं. कर्मचारी जल्लोष करायचं सोडून निषेध नोंदवण्यासाठी पुढे आले. आणि तिथल्या सरकारला त्यांच्या या नाराजीला तोंड द्यायची वेळ आली.

सरकारविरोधात याचिका

सरकारच्या या निर्णयाला खोडून काढायला शेकडो डॉक्टरांनी याचिका सादर केली की, ‘आम्हाला आमच्या गरजेपेक्षा जास्त वेतन मिळतंय, ज्याची आम्हाला गरज नाही. आम्हाला हे वाढवून दिलेलं वेतन नकोय, त्यापेक्षा तुम्ही हा निधी इस्पितळातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी वापरा. जेणेकरून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना अद्ययावत सुविधा मिळतील.’

CNN च्या अहवालानुसार क्युबॅकच्या आरोग्यमंत्र्यांनी असं सांगितलं की, या याचिकेस डॉक्टरांचं बहुमत लाभलं तर पगारवाढीचा निर्णय मागे घेण्यात येईल.

काय वाटतंय जगात यांच्यासारखी माणसं असतील तर चांगले दिवस येतील?

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.